तुडवण मधील :राधाक्का.
तुडवण कादंबरीमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत. राधाक्का ही अशीच एक महत्त्वाची व्यक्तीरेखा आहे. एखाद्याला तीच कादंबरीच मुख्य नायिका वाटू शकेल इतके तिचे आस्तित्व कादंबरीभर आहे.
राधाक्काच्या व्यक्तिरेखेमधून कष्टाळू, कुटुंबवत्सल, जबाबदारीचे भान असणारी, कठिण प्रसंगातही मार्ग काढणारी आणि उद्यावर विश्वास असणाऱ्या ग्रामीण स्त्रीचे दर्शन सहजच होईल असा विश्वास वाटतो.
राधाक्काला यमुना आणि नारायण ही दोन मुले आहेत. नवनाथ हा तिचा पती शेतकरी आहे. आणि तिच्या जन्माला पुरणारा डोकेदुखीचा आजार तिला जडलेला आहे.
नारायणच्या शिक्षणानंतर त्याने अभ्यास करून नोकरीला लागावे असे तिला वाटत असते. मात्र नारायणला नोकरी मिळत नाही. (अपूर्ण )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा