तुडवण: ललित लक्षवेधी पुस्तक

ललित लक्षवेधी: फेब्रुवारी २०२०: प्रा. सुहासिनी किर्तीकर, मुंबई तुडवण : कैलास दौंड मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस : ३०८, फिनिक्स ४५७, एस.व्ही.पी.रोड , गिरगाव, मुबई-४००० पृष्ठे : २४५, मूल्य : तीनशे रुपये शेती, जमीन, शेतकरी हा मराठी मनात रिघलेला विषय. स्वप्ने अधिक रंजकपणे पाहणाऱ्या साहित्यात.विशेषतः कवितेत वा गीतात; या विषयाभोवती कविकल्पना रुंजी घालत राहते. कोवळे, सुंदर, हृदय असे भावचित्र उभे करते. अशा भावगीतातून एखादा शेतकरी बायकोला म्हणतो, ये पिकवू अपुला शेतमळा, उगवू मोतीचुरा. ते हिरवे लोलक डुलती, भरला हरभरा'... किंवा 'काळ्या काळ्या शेतामधी घाम जिरव घाम जिरव, तेव्हा उगल उगल काळ्यामधून हिरव...' पण वास्तवात ते इतके प्रेममय, उत्साहजनक नसतेच.मोतीचूर उगवतोच असं नाही; उलट अनेक स्वप्नाचा चुरा होत जातो. कष्टांना सीमा नसते. दारिद्र्याला असीम जमीन असते. संसार गाठी मारमारून करावा लागतो, एकेक आयुष्य मातीमोल होत जाते. हे सगळे वास्तव 'तुडवण' या कादंबरीत जिवंत झालं आहे. मात्र या वास्तवाला स्वप्रयत्नाने तुडवत कादंबरीतील व्यक्ती आपापल्या ताकदीने सामोर्या जातात. 'तुडवणची वा...