प्रेरक विचारांचा वाचनीय : दरवळ
○ जोरकस प्रेरक विचारांचा वाचनीय :' दरवळ'!
डाॅ. कैलास दौंड
साहित्य चपराक मासिकाचे संपादक आणि सर्वेसर्वा घनश्याम पाटील यांचा दरवळ हा वैचारिक लेखांचा संग्रह नुकताच चपराक प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकात घनश्याम पाटील यांनी वेळोवेळी विविध औचित्याने लिहीलेल्या पंचवीस लेखांचा गुच्छ आहे. निर्भीडपणे आणि लोकोपयोगी विचारांनी व्यक्त होणे हा त्यांचा पिंड या 'दरवळ' मधून प्रामुख्याने दिसतो. 'दखलपात्र ' , 'झुळूक आणि झळा' या आधीच्या लेखसंग्रहाच्या पुढील प्रवास दरवळ मधून नजरेस पडतो. हे लेख दै. संचार, दै. गोमन्तक, दै. आपलं महानगर, दै. दिलासा, दै. पुण्यनगरी,दै. एकमत व पुढारी , संचार, अपेक्षा, साहित्य स्वानंद, व्हिजन सोलापूर, पुण्यनगरी या दिवाळी अंकातून पूर्व प्रसिद्ध झालेले आहेत. विषयाची विविधता आणि लेखनामागची तळमळ या सर्वच लेखांमधून ठळकपणे जाणवते. त्यामुळे दरवळ हा लेखसंग्रह सर्व वयोगटातील वाचकांना आवडेल व विचारांना गती देईल असे दिसते.
दरवळ मधिल पंचवीस लेखांचा गुच्छ हा विषय वैविध्याने नटलेला असला तरी समाजाचा चांगुलपणाकडे प्रवास व्हावा या एकमेव ध्येयाचा धागा त्यांना एकत्र ठेवण्यात यशस्वी झाला आहे. पाटील हे पत्रकार देखील आहेत. त्यामुळे विषयाला भीडणे त्यांना जमते. या सर्वच लेखातील आशयाकडे एक कटाक्ष टाकला असता 'दरवळ' मधील विचारकण सहजच आकृष्ट करतात.
'स्वतः पासून सुरूवात महत्त्वाची' या लेखातून लेखक स्वविकास साधण्याची आवश्यकता प्रतिपादन करतो. तर 'दुर्बल सबल व्हावेत' या लेखात प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतय. याकडे ते लक्ष वेधतात. 'अगम्य, अतर्क्य' मध्ये आजच्या तथाकथित स्री ~पुरूष समानतेच्या बोलण्यातील फसवे वास्तव अधोरेखित करतात आणि खोट्या दिखाव्याचे मळभ दूर होण्यासाठी शूभेच्छा देतात. 'क्षणिक मोहापायी' लेखांमधून स्री पुरूष संबंधातील विचार आणखी एक पैलू घेऊन पुढे येतात . ' पुढे खडतर काळ! ' या लेखात स्री भ्रुण हत्येवर भाष्य केलेले दिसते. मिरजचा डाॅ. बाबासाहेब खिद्रापूरे, बीडचा डाॅ. बालाजी मुंढे यांनी केलेल्या क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या भ्रूण हत्येच्या दुष्कृत्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'उर्जादायी भक्तिसोहळा' या लेखात वारकरी, वारी, पर्यावरण या संबंधाने विचार मांडताना ते लिहीतात - " या वारकऱ्यांनी आता सामाजिक भान ठेऊन, पर्यावरणाचा विचार करून वागायला हवं. स्वच्छतेच्या दृष्टीने शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे पर्यावरणाचा र्हास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसं झालं तर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचा लौकिक आणखी वाढेल.(पृष्ठ ४८) तर 'जागर' समर्थ महासंगमाचा! या लेखातून जांब येथे झालेल्या समर्थ महासंगमाच्या निमित्ताने समर्थांच्या विचार
आणि कार्याचा मागोवा घेतात.
'धोका प्रतिक्रियावाद्यांचा ' या लेखात फारसा विचार न करता समाजमाध्यमावर वा अन्यत्र प्रतिक्रिया व्यक्त करणार्यांचा लेखकाने सोदाहरण समाचार घेतला आहे. 'दोन घडीचा डाव' हा युवा संत भय्युजी महाराजांच्या आत्महत्येनंतर लिहीलेल्या लेखात अशा घटना चटका लावून जाणाऱ्या असतात हे सांगुन ते पुढे लिहीतात -'पण या क्षेत्रातील माणूसही मनावर, इंद्रियावर संयम ठेवू शकत नाही असा दुर्दैवी संदेश देणारं आहे.'
'साहित्यिक दहशतवाद घातक' हा लेख यवतमाळ येथील साहित्य संमेलन काळात लिहीलेला दिसतो. नयनतारा सहगल यांना संयोजकांनी उद्घाटक म्हणून निमंत्रण देणे आणि त्यांचे लिखित भाषण येताच त्यांचे निमंत्रण मागे घेणे यामुळे हे संमेलन चर्चेत आले होते. या लेखाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते की,' सम्यक समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी कुठल्यातरी एका पक्षाची(बाजूची) भूमिका घेणे हे आजच्या पत्रकारितेचे व्यवच्छेदक लक्षण बणले आहे. त्यामुळे वाचक देखील गोंधळलेला असतो आणि या गोंधळलेल्या स्थितीचा वृत्तपत्रे फायदा उठवत असतात.' मात्र 'साहित्यिकांनी त्यांच्या विचारधारा, गटतट यांच्या पुढं जाणं गरजेचं आहे. असे मत घनश्याम पाटील नोंदवतात. (पृष्ठ ५६) ते महत्वाचे आहे. ' साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत! ' या लेखातून लेखकाना पूर्णवेळ लेखक होण्यासाठी आवाहन करतात. त्याचवेळी नवोदित लेखकांना विधिध विषयावर गुणवत्तापूर्ण लिहीण्याचा प्रोत्साहन देत वाचन आणि अभ्यासाचा आग्रह धरतात.
'राहिलेलं' राहूच द्या. या लेखात लेखक स्वतःच्या जडणघडणीचे जणू सिंहावलोकन करीत आहे. राहून गेलेल्या गोष्टीची खंत करण्यापेक्षा आपल्या कार्याचे समाधान त्यांना वाटते.'राहून गेलेल्या गोष्टी' पेक्षा' करावयाच्या गोष्टी' मला जास्त महत्वाच्या वाटतात. असे ते आवर्जून नमूद करतात. 'आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला ' या लेखात पाटील शेतकर्याच्या प्रश्नावर चिंतन करतात. 'विरोधक सत्तेत आले की शेतकरी विरोधी निर्णयच घेतात. आणि एकेकाळी सत्तेत असलेले विरोधक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून गळे काढतात. '(पृष्ठ ६४) . असे भीषण वास्तव मांडतात.
'शाकाहाराची चळवळ राबवा!' हा सामाजिक दृष्ट्या महत्वाचा लेख अप्रतिम अवतरला आहे. या लेखातील 'गायीसाठी माणूस मारणारे धर्मरक्षक नसून धर्मासाठी कलंक आहेत.'(पृष्ठ ६६ ) , 'शाकाहारी -मांसाहारी या संकल्पना धार्मिक आहेत, वैज्ञानिक नाहीत.' (पृष्ठ ६७) अशी वाक्ये प्रागतिक विचारांचा जागर करतात. लेखकाच्या आजूबाजूला घडणाऱ्या नानाविध घटना आणि घडामोडींवर वैचारीक प्रतिक्रिया देऊन सकस भूमिका घेण्याच्या वृत्तीची ओळख 'दरवळ ' मधील लेखांतून पटते. ' हे करायलाच हवं ' या लेखात जबाबदार नागरीक म्हणून अपघातग्रस्तांना मदत करायलाच हवी. हे बजावतात.
' देशभक्तीची व्याख्या काय? 'या लेखातील 'विविध धर्मिय बांधवांच्या सण- उत्सव, परंपराविषयी आदर बाळगून सांगावसं वाटतं की तुमच्या धार्मिक भावनांचं प्रकटीकरण करताना जो अतिरेकी उत्साह दाखवला जातो आणि त्यामुळं सामान्य माणसाची जी दैना होते ती थांबवणे ही सुद्धा मोठी देशभक्तीच ठरेल.' (पृष्ठ ७३) हे वाक्य सामाजीक ऐक्यासाठी किती महत्वाचे आहे. हे आपण जाणतोच. तर 'कशासाठी? भुकेसाठी' या लेखातून भूकेच्या विधिधरूपाचा परीचय करून देतांनाच 'भूकबळी जाणार नाही तो आपल्यासाठी सुदिन.' असा आशावाद व्यक्त केलेला आहे.
'दहशतवादाला धर्म असतो!' मधून लेखक पाटील हिंदू धर्मासह सर्वच धर्मातील चुकीच्या प्रवृत्ती, परंपरा, अंधश्रद्धा दूर व्हायला हव्यात. आपण माणूस म्हणून जगायला हवं. अशी प्रांजळ भावना व्यक्त करतात. खरे तर आज भारतात अस्तित्वात असणाऱ्या अनेक धर्माची निर्मितीच चुकीच्या प्रवृत्ती, परंपरा, अंधश्रद्धा आणि कर्मठपणा यापासून दूर होण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच झालेली आहे. पण आज काय परीस्थिती दिसते? या पार्श्वभूमीवर लेखकाचे चिंतन डोळे उघडवणारे आहे.
'पुरोगामी कोणाला म्हणावं? 'हा लेख वाचकांना वैचारीक खाद्य तर पुरविलच परंतू त्याच बरोबर विचारांची घुसळणही घडवून आणेल.
'दरवळ' या वैचारिक लेख संग्रहातील सुभाषितवजा काही वाक्ये वाचकांचे लक्ष वेधून घेतात. उदा : 'चेहरा आणि मुखवटा यातलं अंतर गळून पडलं की माणसाचं व्यक्तिमत्व उजळतं.' (पृष्ठ -२१).'चालकानं गाडी चालवायची असते. प्रवासी त्यांचं इच्छित स्थळं आलं की उतरतात. चालकानं त्याची तमा बाळगू नये! '( पृष्ठ ६२)
हे सर्व वृत्तपत्रात आणि दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले लेख आहेत. त्यामुळे अर्थातच बहुतांश लेख आकाराने लहान आहेत. लहान लेखांतून व्यक्त व्हायला मर्यादा येतात. त्यातही मुख्यविचाराला अग्रेसित करण्याचे कसब पाटील यांच्या लेखनातून दिसते. थोडक्यात आणि नेमकेपणाने व्यक्त होण्याचे कसब लेखकाच्या ठाई असल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच लेख घट्ट वीणीचे झालेले आहेत.
'साहित्यिक दहशतवाद घातक' ,
'जागर समर्थ महासंगमाचा ' व 'दोन घडीचा डाव ' ,' विचारांचं स्मारक बांधा ', ' ही तर मॅकॉलेची अवलाद' , ' जातियगंडाची शोकांतिका' हे लेख प्रासंगिक आहेत. तर काही लेख प्रासंगिक असूनही प्रासंगिकतेवर मात करणारे आहेत. 'दरवळ' ची द. ता. भोसले यांनी लिहीलेली प्रस्तावना एकुणच पुस्तकाचे विचारसूत्र उलगडवणारी आहे.
लेखकाचे साध्या, सरळ आणि जोरकस पद्धतीने व्यक्त होणे बहुतांश लेखातून प्रत्ययास येते. विचारांची स्पष्टता आणि भूमिकेची व्यापकता त्यांच्या लेखनातून प्रत्ययास येते. समकालीन विषयाला भिडणारे लेख असल्याने युवा वाचकांना हा वैचारीक लेखसंग्रह भूरळ घालील तर प्रौढ आणि वयस्क वाचकांना हा मनकवडा लेखक आपल्या मनातले लिहीतो आहे असे नक्की वाटेल.

• दरवळ : वैचारिक लेखसंग्रह
• लेखक : घनश्याम पाटील
• प्रथमावृत्ती : ६ जून २०२०
•प्रकाशक : चपराक प्रकाशन , पुणे ३८
• पृष्ठे :१२८ • मूल्य : २००₹
~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा