पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता. डाॅ. कैलास दौंड

इमेज
  'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता.                                     डाॅ. कैलास दौंड     मराठीमध्ये कविता मोठ्या प्रमाणात लिहीली जाते मात्र स्रियांची कविता तशी कमीच आहे. 'रिंगण' नावाचा कवयत्री माधुरी मरकड यांचा  पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहात सत्याहत्तर कविता आहेत. फारशी पूर्व प्रकाशित नसलेली कविता 'रिंगण ' च्या रूपाने मराठी काव्यरसिकांच्या समोर आली आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे स्त्रीवादी कविता आणि दुसरा भाग निखळ भावकविता .           स्रीवादी कवितांमधून कवयत्रीच्या स्रीवादी जाणिवेची क्षितिजे विस्तारत असल्याची ओळख पटवणार्‍या काही कविता येतात. तर निखळ भावकवितेत अन्य विविध भावानुभूतीच्या कविता येतात. यात बापाचा मृत्यू,  प्रिय आई, प्रिय मुली, प्रिय आजी अशा नातेसं...

गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.

इमेज
  ○ गावखेड्यातील तरूणांची भयावह शोकांतिका- तुडवण.                                •  प्रा. डॉ. द. के. गंधारे                                                   ग्रामीण साहित्यिक कैलास दौंड यांचा जन्म पाथर्डी तालुक्यातील सोनोशी या खेडेगावात झाला. ग्रामीण जीवनाचा त्यांनी जवळून आणि सजग अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या  एकूणच साहित्यातुन  ग्रामानुभवाची सशक्त मांडणी येते. शेतीमाती आणि तिथल्या माणसाशी नाते जोडून त्यांनी शेती बरोबरच  गावगाड्याचे गाऱ्हाणे वेशीवर टांगण्याचे काम केले . 'कापूसकाळ', 'पाणधुई' या त्यांच्या कादंबऱ्या ग्रामजीवनाचे वास्तवरूप मांडतात. 'अंधाराचा गाव माझा', 'उसाच्य...

गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे "मा झे गा णे आनंदाचे"

इमेज
 गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या  बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे  "मा झे गा णे आनंदाचे" अर्जून देशमुख  ------------------##### बघता बघता सारं काही ऑनलाईन झालं. ग्लोबलायझेशन. ..आणि सारं काही डिजीटल झालं. मोबाईल ने तर क्रांती च केली. आणि प्रत्येकजण मोबाईल झाला. विविध वाहिन्यांचं जाळं , आणि बरच काही. ..! एकूण अनेक बाबतीत बालमनांवर परिणाम झाला. आणि होतो आहे.  मुले मोबाईल वापरण्यात मास्टर झाली. मोबाईल कसा हाताळायचा त्यातले अॅप्स, फेसबुक, व्हाॅटस्अप, यू ट्यूब, टिक टाॅक, आणि पफ जी सारखे संमोहित करणारे जीवघेणे गेम्स. ..याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  मोबाईल कसा वापरावा हे मोठ्यांना मुलांकडून शिकावं लागतं हे आजचं वास्तव आहे! म्हणजे "गुरूला चेला भारी"..!हे असं झालय.  ऊन, वारा, पाऊस, ऋतू, महिने, सण, वार, उत्सव, डोंगर, नद्या, ,झाडे, वेली, फुले , फळे ,आकाश , जमीन, चंद्र, चांदण्या, प्राणी, पक्षी या भोवतीच्या विश्वापासून बालमने दुर्मिळ झाली.  आणि या जरा इकडे मुलांनो. .गाणे गावू आनंदाने. . म्हणत कवी डाॅ. कैलास दौंड बालमनास कवितेतून साद घालत आहेत. अवघ्या ...

संस्काराची पेरणी : माझे गाणे आनंदाचे : डाॅ. भाऊसाहेब मिस्तरी

इमेज
॥ आगंतुकाची स्वगते॥ बालकविता संग्रह   संस्कारांची पेरणी - माझे गाणे आनंदाचे                  ● डॉ.भाऊसाहेब मिस्तरी                       बालसाहित्य लिहितांना पालकाला बालक होता यायला हवं असं मला मनापासून वाटतं. ज्या कोणाला हे खऱ्या अर्थाने जमलं तो खरा बालसाहित्यिक ! त्यांच्या लेखणीतून उत्तमोत्तम असं बालसाहित्य निर्मिती होत असते ही माझी समज आहे.  साने गुरूजी वयाने मोठे होते तरी ते मुलांमध्ये मुल होऊन "श्यामची आई " सारखी  'संस्कार गाथा ' सांगून गेलेत. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ती महत्त्वाची आहे.   समकालीन मराठी साहित्यात काही बालसाहित्यिक यांची नावे पटकन आठवतात. आबा महाजन,उत्तम कोळगावकर, एकनाथ आव्हाड, दासू वैद्य, पृथ्वीराज तौर आधी नावं सहजपणे ओठांवर येतात. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून मा. किरण केंद्रे सर यांच्या हातून ' किशोर ' मासिकाच्या माध्यमातून मोठे काम होत आहे. बालसाहित्यिक म्हणून आता डॉ. कैलास दौंड यांचे नाव लक्षात राहतं. त्यांचा " माझी गाणे आनंदाचे " ह...

आगंतुकाची स्वगते : डाॅ. कैलास दौंड यांचा नवा कवितासंग्रह

इमेज
 आगंतुकाची स्वगते या कवितासंग्रहासाठी डाॅ. कैलास दौंड यांना सायं. ६  ते ९ या वेळेत संपर्क करा : 9850608611 ISBN : 9789386421401