गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे "मा झे गा णे आनंदाचे"
गाव खेडे, आणि निसर्ग अशा सहवासात वाढत असलेल्या
बालमनांचं प्रतिबिंब म्हणजे
"मा झे गा णे आनंदाचे"
अर्जून देशमुख
------------------#####
बघता बघता सारं काही ऑनलाईन झालं. ग्लोबलायझेशन. ..आणि सारं काही डिजीटल झालं. मोबाईल ने तर क्रांती च केली. आणि प्रत्येकजण मोबाईल झाला. विविध वाहिन्यांचं जाळं , आणि बरच काही. ..!
एकूण अनेक बाबतीत बालमनांवर परिणाम झाला. आणि होतो आहे.
मुले मोबाईल वापरण्यात मास्टर झाली. मोबाईल कसा हाताळायचा त्यातले अॅप्स, फेसबुक, व्हाॅटस्अप, यू ट्यूब, टिक टाॅक, आणि पफ जी सारखे संमोहित करणारे जीवघेणे गेम्स. ..याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
मोबाईल कसा वापरावा हे मोठ्यांना मुलांकडून शिकावं लागतं हे आजचं वास्तव आहे! म्हणजे "गुरूला चेला भारी"..!हे असं झालय.
ऊन, वारा, पाऊस, ऋतू, महिने, सण, वार, उत्सव, डोंगर, नद्या, ,झाडे, वेली, फुले , फळे ,आकाश , जमीन, चंद्र, चांदण्या, प्राणी, पक्षी या भोवतीच्या विश्वापासून बालमने दुर्मिळ झाली.
आणि या जरा इकडे मुलांनो. .गाणे गावू आनंदाने. . म्हणत कवी डाॅ. कैलास दौंड बालमनास कवितेतून साद घालत आहेत. अवघ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांना सुपरिचित असलेल्या कवी डाॅ. कैलास दौंड यांचा बालकवितांचा
"माझे गाणे आनंदाचे "हा पहिलाच कविता संग्रह. ..!कवी कैलास दौंड हे पेशाने प्राथमिक शिक्षक असून, प्रामुख्याने गाव, खेडे, वाडी, वस्ती, आणि तिथं शिक्षणाचे. .ज्ञानाचे कण वेचणारे बालमने हा त्यांच्या कवितांचा गाभा असून, त्या त्यांच्या साक्षांकित बालमनांच्या जाणीवा आहेत.
या संग्रहात एकूण सदोतीस कविता असून मुलांच्या सहवासातूनच या कवितांची निर्मिती प्रक्रिया झालेली आहे असे मनोगतातच कैलास दौंड यांनी कबूल केलेले आहे. यातील काही कविता मुलांच्या ओठातलं गाणं झाल्या असून, या कविता त्या बालमनांचं प्रतिबिंब आहेत. प्रामुख्याने गाव, खेडे ,वाडी, वस्तीतील बालमने या कवितांचं प्रतिनिधित्वं किंवा नायकत्वं अधोरेखित करताना दिसतात.
अत्यंत साध्या बोली भाषेत या कविता असून वाचताना मस्त गंमत येते.
या संग्रहातील कवितांची विश्लेषणात्मक चिरफाड न करता मला निव्वळ आवडलेल्या कवितांच्या ओळी कडवे मुद्दामून इथे नमूद करत आहे!
----------------------------
हळूच पुढे येतो, मऊ मऊ ससा
विचारताच प्रश्न -म्हणतो
दुखतो -माझा घसा!
(कविता /स्वप्नातील शाळा )
(हा भिञा ससा आपली अडचण सांगून मोकळा झाला. )
म्याॅव म्याॅव करीत ओरडतो बोका,
म्हणतो, सर मला इंटरनेट शिका!
(स्वप्नातील शाळा )
रेशमाच्या डब्यात, होते काय तरी
मिरचीचा ठेचा, आणि बाजरीची भाकरी!
राहूल वेंधळा, मोकळाच आला
घाई घाई म्हणाला, डबाच नाही झाला.
सविताच्या डब्यात गरमागरम ताजी
दोन चपात्या अन् भेंडीची भाजी!
(कविता /सहभोजन )
परीच्या पंखांची हवी जरी गादी
ढगांची ओलांडून जावी लागेल लादी!
पावसावरती कविता लिहितो
उन्हामध्ये बसून,
दगडामधून पाहत बसतो
खुशाल डोळे वासून! (कविता /कवी)
वाढ बाई वाढ, त्याला खत काला
येईल खूप झाडाला पाला! (कविता /वाढ बाई )
आता गट्टी फू सुटू दे, माझी मैत्रीण भेटू दे!
घासामधला अर्धा घास
मैञीणीला देवू खास
मधल्या सुट्टीच्या जेवणाचा
स्वप्नात व्हावा तिला भास
मनामधी मांडून झाले
हजार डाव खेळाचे
गळ्या शप्पथ सांगू तूला
आता आपण बोलायचे,
(कविता /गट्टी फू -ही कविता मैञी तला दुरावा आणि जिव्हाळा अधोरेखित करते.)
एकदा वर्गात आला ससा
मुलांना म्हणाला शांत बसा!
खेळण्याचा दुकानदार
जञेत आला वाघ
मुलांना म्हणाला
हवं ते माग!
नाचत बागडत
बागेत आलं हरीण
चिऊला म्हणालं
तुझा कान धरीन!
लबाड कोल्होबा
शहाणा झाला
बाबांना म्हणाला
माझं नाव घाला!
(कविता /एकदा )
ही कविता लक्षवेधी आणि फॅटसी आहे
वाचताना छान वाटते.
यातील काही कविता बालगीते वाटतील अशा छंदोबद्ध आहेत
एकूणच कवी डाॅ. कैलास दौंड यांचा बालकवितांचा हा पहिलाच कविता संग्रह छान आणि वाचनीय आहे.
--------------------
!!अर्जुन देशमुख!
98 34 82 93 13
-------------------@@
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा