• 'काटेरी पायवाट ' : धडपडणाऱ्या तरूणांना भान देणारे आत्मकथन. डाॅ. कैलास दौंड 'काटेरी पायवाट' हे प्रा. डाॅ. अनंता सूर यांचे आत्मकथन. त्यांच्या या आत्मकथनातुन ग्रामीण भागातील मुलाची कठीण शैक्षणिक वाटचाल समोर येते. त्यासोबतच सहाजिकच कुटुंबातील माणसे, परीसर, वाट्याला आलेली अभावग्रस्तता, वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, त्यावर कष्टाने आणि निर्धाराने केलेली मात आणि त्यानंतर प्राध्यापक होण्यापर्यंत मारलेली मजल 'काटेरी पायवाट' मधून कळत जाते. लेखकाची कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील व इतर नातेवाईक यांचे प्रसंगपरत्वे येणारे चित्रण, लेखकाचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तसेच या विविध टप्प्यावर त्याचे विकसित होत जाणारे आकलन आणि विचारविश्व, त्याने जपलेली कष्टावरील श्रद्धा आणि विश्वास , माणुसकी उलगडणारे हे आत्मकथन अलीकडील काळातील महत्त्वाचे आत्मकथन आहे. आपल...