शिक्षणयात्री ४||शिक्षणबागेच्या शिल्पकार : दिपाली सतीश सावंत.||
शिक्षण यात्री शिक्षणबागेच्या शिल्पकार : दिपाली सतीश सावंत. वर्धा जिल्ह्यातील शेकापूर (बाई) येथे कार्यरत असणाऱ्या दिपाली सतीश सावंत यांची हिंगणघाट तालुक्यातील शहरापासून जवळपास ४०कि.मी. अंतरावरील साडेतीनशे लोकवस्तीच्या ‘कोल्ही’ गावातून २००६ मध्ये शिक्षिका म्हणून सेवेला सुरूवात झाली. या गैरसोयीच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी त्यांना त्यांच्या पतीने साथ दिली. जवळच असणाऱ्या शेकापूर गावात त्या पतीसह राहायला आल्या. कोल्ही गावात फारसे शैक्षणिक वातावरण नव्हते. गावापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर पारधीबेडा होता. दिपाली सावंत आणि त्यांचे सहकारी नाईक गुरुजींनी पारधीबेड्यावरील मुले शाळेत आणायला सुरुवात केली. ही मुले अस्वच्छ असल्यामुळे शाळेत नेऊन त्यांचे हातपाय धुणे व त्यांच्या केसांना तेल लावून विंचरून नीटनेटके करणे ही कामे करण्यासाठी दिपाली यांनी पुढाकार घेतला. नाईक सर देखील या कामात मदत करत. शाळेच्या अवस्था म्हणजे चार वर्ग आणि एक खोली तीही अगदी धोकादायक म्हणता येईल अशी. म्हणून मग जवळच्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली शाळा भरू लागली. या उघड्यावरील शाळेचा एक नकळत फायदा झाला तो असा की...