उपक्रमांचे रोल मॉडेल : जरेवाडी शाळा
उपक्रमांचे रोल मॉडेल : जरेवाडी शाळा बीड जिल्हा परीषदेची पाटोदा तालुक्यातील जरेवाडी शाळा यशस्वी उपक्रमांचे रोल मॉडेल बनली आहे. शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे, समर्पण भावनेने कार्य करण्याने आणि समाजसहभागाने या शाळेने राज्याचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले . बीड जिल्ह्यात तर जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन जरेवाडी नावाने अभियानच सुरू झालेले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार यांना शाळेच्या प्रगतीचे रहस्य विचारले असता - ‘मी नव्हे तर आम्ही ‘ हे त्यांनी आवर्जून सांगत सर्व शिक्षक नियोजनपूर्वक समूहभावनेने काम करत असल्यामुळेच जरेवाडी शाळेने आपले यशस्वीवीतेचे शिखर कायम राखले असल्याचे सांगितले. १९९५ या वर्षामध्ये अवघी २४ पटसंख्या आणि एक शिक्षक , चौथीपर्यंतच्या वर्गाला एकच खोली असणाऱ्या शाळेचे रूपांतर आज तब्बल ८०३ विद्यार्थी संख्या, पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आणि २० शिक्षक, २० वर्गखोल्या असलेल्या शाळेत झाले आहे. जरेवाडी गावाची लोकसंख्या पाहीली तर ती अवघी चारशेच्या आसपास आहे. गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट विद्या...