भावनांचा जाणकार शिक्षक : संतोष जायभाये.
भावनांचा जाणकार शिक्षक : संतोष जायभाये. पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १०० मध्ये शिक्षक म्हणून सेवेत असलेले संतोष बाळासाहेब जायभाये हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.त्यांनी शिक्षणशास्रात घेतलेल्या उच्च शिक्षणाचे उपयोजन वर्गात अध्यापनात केले. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती मिळू शकली. पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा थोडे अधिक आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल का? याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये ते यशस्वी ही होतात. त्यासाठी त्यांना उपयोगी पडते ते विद्यार्थ्यांच्या भावनांचे व्यवस्थापन. संतोष जायभाये यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात सप्टेंबर २००० पासून पुणे मनपा शाळा मुलांची शाळा क्र.२१ मधून केली. त्यानंतर त्यांनी बदली झाल्याने मुलांची शाळा क्रमांक ७५ व मुलांची शाळा क्रमांक ९५ मध्ये अध्यापन कार्य केले. आता ते मनपा शाळा क्रमांक १०० (मुलांची) गाडीतळ, हडपसर पुणे येथे सेवारत आहेत. ते पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांना शिकवत असतात यावर्षी त्यांच्याकडे इयत्ता दुसरीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा वर्ग आहे. ...