पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहर्निश समर्पित शिक्षक : केशव चंदर गावित

इमेज
शिक्षणयात्री 21  अहर्निश समर्पित शिक्षक : केशव चंदर गावित           जि.प.प्रा.शाळा हिवाळी ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग असलेली शाळा. त्र्यंबकेश्वर येथून पन्नास किलोमीटर आणि नाशिक मुख्यालयापासून पंच्याहत्तर किमी अंतरावर असलेल्या या शाळेची स्थापना १९९८ मध्ये झाली. हिवाळी गावाची लोकसंख्या २५० आणि कुटुंबे अवघी ४२ एवढीच. शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या गावातील शाळा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे, ती तेथील केशव चंदर गावित नावाच्या शिक्षकाच्या विशेष कार्यामूळे . शिक्षक केशव गावित या शाळेमध्ये २००९मध्ये नियुक्त झाले.सन २०१२ मध्ये ही शाळा द्विशिक्षकी झाली.२००९ ते २०१४ या कालावधीमध्ये गावित सरांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकासावर भर दिला. सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या शाळेतील हजेरीपटावर असणाऱ्या मुलांपूरतीच मर्यादित शाळा कधीही ठेवली नाही. दाखल पात्र होण्यापूर्वी ही मुले यांच्या शाळेत येतात आणि पाचवी उत्तीर्ण होऊन गेलेली मुले देखील त्यांच्याकडे अभ्यासासाठी येतात.बालवाडीसह त्यांच्या शाळेतील विद्यार्...

कृतिशील शिक्षिका : कुंदा बच्छाव

इमेज
मी नव्हे आम्ही : कुंदा बच्छाव   नाशिक मनपाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर महानगरपालिका शाळा क्रमांक १८ आनंदवली ही त्या परिसरातील सर्वात मोठी शाळा, जिचा पट जवळपास आठशे आहे. कष्टकरी व सर्वसामान्य आर्थिक स्तरातील पालकांची मुले या शाळेत येतात. विशेष म्हणजे या शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत विमान प्रवास असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहण्यासाठी मुंबई व बेंगलोर येथील इस्रोला भेट देण्यासाठी अशा दोन सहली पूर्णपणे लोकसहभागातून काढलेल्या आहेत. शालेय उपक्रमांच्या आखणी आणि अंमलबजावणी मध्ये येथील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा नेहमीच पुढाकार असतो. शैक्षणिक गुणवत्तेतही शाळेतील विद्यार्थी पुढे असतात. आतापर्यंत १८ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत तर आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणारी शाळा म्हणून आनंदवली शाळेची ओळख आहे.‌ या शाळेत ऍस्ट्रॉनॉमी क्लब, स्टेम क्लब असून त्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव दिले जातात. शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या स्टेम क्लब उपक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत एक लाख रुपयांची शरद पवार फेलो...