कविता

रोपांची काळजी

आठवते
साताठ दिवसापूर्वी
तिने कुतूहलाने वर्गात आणलेले
लिलीची रोप कुंडीत लावतांना
किती फुलोरा नाचत होता तिच्या कोवळ्या मनात!
आज सकाळीच आनंदाला उधाण आलं तिच्या
त्याच रोपाला गुलाबी रंगाचं गोड फुल आलेलं पाहुन.
आपण लावल्या रोपाला फुलं लागतात नाजूक
हे कळताच तिच्या आनंदाचं झाडं उंचावत गेलं.
दुपारच्या सुट्टीत मग तिनं - मोगर्याचं झाड आणलं
मैत्रीणीला सोबत घेऊन
तिच्या वाढत्या उत्साहाला मी कुंडीत दिली जागा,
पहिल्याच उत्साहाने तिने लावलं हे रोप. काहींनी पाणी घातलं त्याला.
वर्गातल्या सगळ्या मुलांचे डोळे कुंडीतल्या रोपाकडंच एकटक - शाळा सुटली,
मुले निघाली घराकडे
कुंडी वर्गात ठेवायला सांगताच मुले झाली निश्चित त्या रोपांबद्दल.
मला मात्र तिच्या डोळ्यातल्या काळजीसह अंधारात गुदमरणा-या रोपांची काळजी अस्वस्थ करीत राह्यली. ****************************
डाॅ. कैलास रायभान दौंड मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन. ४१४१०२ मो. ९८५०६०८६११

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर