कविता गुलाम असत नाही.

*कविता गुलाम असत नाही*

तुझ्या कविता छान आहेत
आवडतात मलाही
पण चांगल्याला चांगले म्हणणे
जमत नाही तुलाही.
हे जाणवत राहते तुझ्या बोलण्या इतकेच
तुझ्या कवितेतुनही.
तू असतोस कोणीतरी. ..कोणीतरी खास
तुझ्या शब्दांनाही असतो तोच उग्र वास. ..
मग कवितेचा जीव घुसमटणे आलेच. ..
ज्याला समजते ही घुसमट
त्याचं निखळ असतं मन,
तो माणूस असतो केवळ ,
कुणीच नसतो खास. ..बिस. ..
त्याला खुलं असतं कवितेचं अंगण,
शब्दांनाही सुखावतो त्याचा सहवास
तो लिहित नसतो कवितेला कधीही
ती उगवून येते आपसूक त्याच्या आतुन
स्वतःला खास समजण्याचा  दर्प
कवितेला सोसत नाही. ..
कविता कधीच कुणाची गुलाम असत नाही.

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

         डाॅ. कैलास दौंड
         मु. सोनोशी पो. कोरडगाव
         ता. पाथर्डी जि. अहमदनगर
         पीन. ४१४१०२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर