पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुडवण कादंबरी : प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांची फेसबुकवरील प्रतिक्रिया.

नव्या अक्षरांचे आगमन *तुडवण* कैलास दौंड मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, किंमत : 300 रुपये. कैलास दौंड यांची तुडवण वाचतोय. पहिल्या पानापासून आत खेचून घेते ही कादंबरी. अवश्य वाचावी अशी ही कादंबरी. आज आम्ही दोन प्रति विकल्याही. या कादंबरीचे हस्तलिखित अगोदर वाचलेले होते. नंतर खूप बदल झालेला. पुन्हा वाचनात हे लक्षात येते. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर तसेच बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी, धनगरवाडी, घोंगडेवाडी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई परिसरात बोलली जाणारी नगरी बोली या कादंबरीतून जोरकसपणे समोर येते. राजन गवस यांच्या लेखनात नवे शब्द भरपूर सापडतात. तसेच अनेक नवे शब्द दौंड यांच्या कापूसकाळमध्येही सापडतात. अाता तुडवणमध्ये तर असे अनेक शब्द आणि शेवटी त्यांचा अर्थ अशी सूचीच कादंबरीच्या शेवटी दिलेली आहे. राजन गवस आणि नागनाथ कोत्तापल्ले या ज्येष्ठ लेखकांना ही कादंबरी अर्पण केलेली आहे.  कादंबरीसाठी संपर्क बाळासाहेब घोंगडे अक्षर पुस्तकालय धायरी, बेनकरनगर पुणे - 411041 संवाद : 9834032015

तुडवण : ललित मधील जाहिरात

इमेज

तुडवण कादंबरीवरील वाचकाचा प्रकाशनपूर्व प्रतिसाद

'तुडवण' वरील जागरूक वाचकाचा प्रतिसाद.  ______________________________  तुडवण कादंबरी प्रथम गंधाली दिवाळी अंक २०१५ मधून प्रसिद्ध झाली.  त्यानंतरच्या वर्षी याच दिवाळी अंकांतून 'जमीन' नावाने या कादंबरीचा शेवटचा भाग प्रसिद्ध झाला होता. त्यावर आणखी काम करून  आता मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई येथून' तुडवण' प्रकाशित झालेली आहे. या वाटचालीत ही पत्रे महत्त्वाची ठरली.   ______________________________ पत्र क्र १    स. न. वि. वि.         गंधाली दिवाळी अंक २०१५ मधील तुमची तुडवण कादंबरी वाचली. गरिबीमुळे, अज्ञानामुळे शोषित वर्ग इतर सुधारलेल्या समाजाकडून कसा अधिकच शोषला जातो त्याचे वर्णन तुम्ही नेमक्या शब्दात केले आहे. अक्षरशः शोषित वर्गाची प्रत्येक ठिकाणी तुडवण झालेली बघायला मिळते. त्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत अधिकच लोटले जातात. ते त्यातून हिमतीने परत परत उठायचा प्रयत्न करतात पण ते प्रयत्नही अपुरे पडतात. असे वास्तवाचे चित्रण तुम्ही छान पध्दतीने डोळ्यासमोर उभे केले आहे.   'तुडवण' ही कादंबरी खूप आवडली. तुमच्या पुढच्या साहित्...

तुडवण कादंबरी : प्रसिद्ध लेखक सुरेंद्र पाटील

पाणधुई, कापूसकाळ, या कादंबऱ्यानंतर डॉ.कैलास दौंड या कादंबरीकार मित्राची #तुडवण हे अर्थपूर्ण शीर्षक असलेली कादंबरी आली आहे.वाचन प्रेरणा दिनी बाळासाहेब घोंगडे यांच्या माध्यमातून ती आज मिळाल्याने आनंद वाटला. कापूसकाळने मला अस्वस्थ केलं होतं, त्यामुळे या कादंबरीच्या प्रतिक्षेत होतो. 🍁 ही कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांनी प्रकाशित केली आहे.चित्रकार सतीश भावसार यांनी पुस्तकास सुचक मुखपृष्ठ केले आहे.या कादंबरीचे मनापासून स्वागत.लेखकाला खूप शुभेच्छा.🎶

तुडवण कादंबरी प्रतिक्रिया

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस ने FBवर प्रसिद्ध केलेली वाचकाची  प्रतिक्रिया.  # वर्तमानातील_ग्रामीण_जगण्याचा_वेध_–#तुडवण   मराठी साहित्याच्या प्रवाहाला वेगळं वळण लावण्यात,वेगळा रंग देण्यात आणि वेगळं परिमाण देण्यात ग्रामीण पार्श्वभूमीवरील,अ-नागर जीवनावरील साहित्याचा वाटा मोठा आहे. र.वा दिघे, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, शंकर पाटील, वामन होवाळ,सदानंद देशमुख अशा अनेकांनी ग्रामीण भागातील जगण्याचे – सोसण्याचे कवडसे आपल्या लेखनातून मांडले आहेत.          गेल्या दशकभरामध्ये एकूणच जीवनशैली झपाटयाने बदलली आहे , तांत्रिक प्रगतीपासून ते आर्थिक स्तरापर्यंत अनेक घडामोडींनी शहरातील जीवन जसे व्यापले आहे,तसेच ग्रामीण जगणेही ग्रासले आहे. या बदललेल्या चित्राचा वेध एका कुटुंबच्या माध्यमातून घेणारी कादंबरी म्हणजे कैलास दौंड यांची ‘तुडवण ’. ही गोष्ट जशी डि. एड. होऊनही नोकरी न मिळाल्याने क्लिनरचं काम करणाऱ्या नारायणची आहे,तशीच ती पावसानं ओढ दिल्यावर ओढगस्तीला येणाऱ्या गावगाड्याची आहे,जावयाचा मानपान करण्य़ासाठी लेकीसारखी सांभाळलेली गाय विकणाऱ्या शेतकऱ्याची आणि नियतिच्या फटकाऱ्...

अहमदनगरचे साहित्य : एक दृष्टीक्षेप

इमेज
अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान '            डॉ. कैलास दौंड        ○ पूर्वपिठिका : मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाषा आहे. या राज्याच्या लगतच्या भागातही या भाषेचा वापर केला जातो. जेथे जेथे मराठीचा वापर आहे त्या त्या भागातून मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीची अधिकतर शक्यता असते . कारण संवाद साधणे हा वाङ्मय निर्मितीचा प्रमुख हेतू असतो. 'अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान 'या विषयाच्या अनुषंगाने विचार करतांना सर्वप्रथम या जिल्ह्याच्या विस्तृत भौगोलिक क्षेत्राकडे लक्ष वेधले जाते. अहमदनगर  (शहराची) स्थापना इ.स. १४९४ साली झाली. त्याही पूर्वीची काही वर्षे हे ठिकाण राजकीय केंद्र होते. नंतर निजामशाहीचेही हे केंद्रच होते .म्हणजे येथे राजसत्ता होती आणि त्या आश्रयाने वाढणारे, राहणारे लेखक, कलावंत हे देखील असणारच. आजच्या अहमदनगर जिल्ह्याबद्द्ल बोलतांना  या जिल्ह्य़ातील विस्तृत भूभाग आपले लक्ष वेधून घेतो. आजही महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाचा लौकिक आहे. राज्याच...

गाव : ऊब आणि धग १

इमेज

गाव : ऊब आणि धग १३

इमेज
                □ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड ________________________________     काळाच्या लाटा येती , गावाच्या भाळावरती ।     गावपणाला येते जाते, ओली- सुकीशी माणूस भरती॥         लोकवस्तीच्या रूपाने अस्तित्वात असणारा गाव तगधरू आहे. आता मोडेल, संपेल,उदासपणे ओस पडेल, केवळ खुणा उरतील असे वाटत असतांनाच कुठेतरी त्याला पालवी फुटत असते. कात टाकून गाव नवे रूप घेत असते. एकुणच काय तर गाव कमालीचे तग धरू आहे. म्हणूनच गावाला शेकडो वर्षाचा इतिहास असतो. त्याची पूर्वीची नावे वेगळी असतात, काळानुरूप गाव नवी नावे सुद्धा धारण करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे गावाला कधीकधी त्याची जागा बदलावी लागते. अशा कठीण काळातही गाव आपले आधीचे नाव आणि आधीचे जगणे विसरत नाही. काळाचे आणि बदलाचे अनेक आघात झाले तरीही गाव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत राहते. गावाच्या लेखी ते जणू अपरिहार्य असते. गाव जमीन, डोंगर, घरे, रस्ते, शाळा इत्यादींनी बणलेले असले तरी ते जैविक दृष्ट्या आणि ...

गाव : ऊब आणि धग १२

गाव : नवे रंग, नव्या जखमा                               डाॅ. कैलास दौंड   गावच्या सुपिक मातीला आता नापिकीचे बहर येतांना दिसू लागले आहेत. पहिल्या पावसानंतर येणारा मृदगंध रोमारोमात चैतन्य भरवण्या ऐवजी रोगराईला साद घालत आहे. मात्र तरीही गावातील अस्सल सर्जनाची ओढ काही संपलेली नाही. बदलत्या काळात जग बदलत असतांना गाव बदलणे अगदीच सहाजिकच होते. बदल हा तर सृष्टीचा नियमच त्याला अव्हेरून कसे चालेल. मात्र या बदलाला व्यक्तिगत स्वार्थ,  नियोजनशून्यता आणि  दूरदृष्टीचा अभाव याची कुसंगत लाभल्याने गावाच्या नव्या रंगात नव्या जखमांचे दर्शन सहजच घडू लागले आहे .  नवनिर्मितीचा लोभस  रंग कायमच माणसाला खुणावत आलेला आहे. उगीचच भाबडेपणाने ' जुने ते सोने' उगाळणे योग्य नसले तरी या गाव बदलांचा मागोवा घेणे हे नव्या पिढीला भान येण्यासाठी आवश्यकच असते.                गाव बदलत असता...

गाव : उब आणि धग भाग ९

इमेज
  गाव : उब आणि धग (९) □ पंखावर त्यांनी , झेलले आभाळ!                          डॉ. कैलास दौंड      "पंखावर त्यांनी, झेलले आभाळ       मिळविले बळ, पोटासाठी." पाव शतकापूर्वी बर्‍यापैकी समृद्ध भासणारा गाव आता तिथल्या माणसांच्या गरजाही नाही भागवू शकत. तसं हे चित्र एकदम पालटलेलं आहे असं नाही. नव्वदच्या दशकापासून दिसामासानं हे बदल नजरेत भरायला लागलेत. किमान पोटाची खळगी भरावी एवढ्याचसाठी गाव सोडून इथे तिथे भटकण्याची वेळ अनेकांवर आलीय. थोडीशीच असलेली जमीन; सिंचनाच्या सोईचा अभाव आणि कुठे विहीर वगैरे असलेच तर विजेच्या नावानं आणि उन्हाळ्यात पाण्याच्या नावानं ठणाणा ऽऽऽ! असा ' ठणाणा पोरा ऽऽ ठणाणा ऽऽऽ' चा खेळ झाल्यानंतर आपलं चंबूगबाळ डोक्यावर घेऊन गावाबाहेर पडावं लागल्यास नवल ते काय?         पावसाचं पाणी साचावं यासाठी जागोजाग खड्डे खणले गेलेत पण पर्यावरणीय बदल, हवामान बदल आणि बेलगाम बेफिकीरीने...