पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी

इमेज
बालसाहित्यात कुठला तरी एकच रस असावा असा अट्टाहास बालसाहित्याचे फार काही भले करणारा खचितच नाही. मुळात बालसाहित्य वाचनीय हवे. बालकांच्या ज्या वयोगटासाठी ते लिहीलेले आहे त्या वयोगटातील बालकांच्या भावविश्वाशी आणि मनोवृत्तीशी तादात्म्य पावणारे ते असावे.  'खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी' हा बालकथासंग्रह एक जानेवारी २५ रोजी छापून उपलब्ध होईल. हे माझे बालसाहित्याचे चौथे पुस्तक आहे. बत्तीस वर्षाचा बालकांचा सहवास, त्यांच्या अनुभवविश्वाच्या, विचारविश्वाच्या आणि परीसरविश्वाच्या परीचयाचा कस बालसाहित्य लेखनात लागला आहे. या बालकथासंग्रहातील बालकथा किशोर मासिक, गोवनवार्ताचे हुप्पा हुय्या दिवाळी अंक, लाडोबा मासिक इत्यादी मधून पूर्वप्रकाशित असून बालवाचकांपर्यंत  सुट्या सुट्या स्वरूपात गेलेल्या आहेत.      साहित्य चपराकचे घनश्याम पाटील तथा आमचे दादा यांनी बालवाचकांसाठी लाडोबा मासिक सुरू करून बालवाचकांसाठी मराठीत अत्यल्प असलेल्या नियतकालीकात मौलिक योगदान देणे सुरू केले. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून 'लाडोबा' प्रकाशन सुरू करायचे नक्की केले. त्यासाठी पहिले पुस्तक म्हणून ' खारूताईचे जंगल ...

गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा

इमेज
• गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा.                                                                                                               डॉ.कैलास दौंड       मराठी बालकुमार साहित्यामध्ये कथांचा मोठा खजिना दडलेला आहे. अगदी पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, अकबर बिरबल यांच्या कथा आणि तोंडोतोंडी चालत आलेल्या, सर्वदूर प्रचलित असणाऱ्या लोककथा यांनी बाल-किशोर आणि कुमार अशा विभिन्न वयोगटातील बालकांच्या भ...

बालकथा #मला नको मोरपीस

इमेज
  बालकथा • मला नको मोराचे पीस      आज शारदा शाळेतून आली तीच मोठ्या खुशीत. दप्तर वगैरे घरात ठेवलं आणि  ती आईकडे वळली. “ आई, आज मी शाळेत मोराचे पीस बघितलं. माझ्या मैत्रिणीने आणलं होतं. अग किती सुंदर होतं म्हणून सांगू तुला ते! आई कुठे भेटतात गं मोराची पिसं? मला पण एखादं मिळालं ना, मी खूप जपून ठेवील. गालावरून फिरवलं की इतकं मऊ लागतं की बापरे!” शारदा मोठ्या आनंदाने व कौतुकाने सांगत होती.  वडीलही घरी आल्यावर तिने त्यांनाही हेच सांगीतलं. खरंच होतं तिचं. मोराचे पीस कोणाला बरे आवडत नाही ! सगळ्यांनाच ते आकर्षित करतं. हवाहवसं वाटतं.      लहानग्या शारदाला मोरपीस फार आवडायचे. पांढरी काडी, तिच्या दोन्ही बाजूला रंगछटा बदलणारे धाग्यासारखे फुटवे ,त्यावरील छोटे छोटे रोम आणि त्या मोरपीसाचे खास आकर्षण असलेला त्यावरील डोळा हे सारेच वैभव किती सुंदर! मैत्रिणीच्या पुस्तकातील मोरपीस  हातात घेऊन तिने स्वतःच्या गालावर फिरवले तेव्हा तिला त्याच्या मऊशार स्पर्शाने गुदगुल्या झाल्या. मात्र लगेचच मैत्रीणीने तिच्याकडील मोरपीस परत मागितले. ...

कथान्वय

इमेज
दुर्मिळ निसर्ग रूपे आणि लोककथा      आपल्या पर्यावरणात प्रचंड प्रकारची विविधता आहे. ही विविधता जशी जीवसृष्टीच्या बाबतीत आहे तशीच ती भौगोलिक दृष्ट्या देखील आहे. कुठे पेमगिरी सारख्या गावात विस्तीर्ण असे वडाचे झाड दिसते. तर कुठे उंच उंच कळसुबाई सारखे शिखर दिसते ! कुठे प्रचंड खोल दऱ्या , कुठे नागफणी सारखे कडे. कुठे रांजण खडकातून वाहणारी नदी तर कुठे जिवंत पाण्याचा झरा यासारखी कितीतरी विभिन्न भूरूपे आपल्याला वेगवेगळ्या भागात पहावयास मिळतात. या आणि अशा भूरूपांना पाहून माणसाला त्या भूरूपाच्या निर्मिती विषयी कल्पना कराव्याशा वाटल्या असणार. अशी भूरूपे भव्यदिव्य आणि जवळपास एकमेव ठरतील अशी असल्याने कुठल्या तरी देव देवतेच्या चमत्काराशिवाय ती निर्माण झाली असणे शक्य नाही असे सामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक होते. पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अभाव आणि सुविधेची उणीव असल्याने ही भूरूपे कशी निर्माण झाली याबद्दल फारशी माहिती नसल्याने माणसांनी ज्या कल्पना केल्या, त्या वास्तवदर्शी नसल्या तरी लोकमनाचे प्रतिनिधित्व घडवणाऱ्या होत्या. त्या रंजक देखील होत्या. माणसांनी निसर्गातील अशा दुर्मिळ रूपांशी आपल्...

भूमीनीष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे

इमेज
भूमीनिष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे.         पाथर्डीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पटलावरील बाबुजी आव्हाड महाविद्यालय हे अत्यंत महत्त्वाचे नाव. एखाद्या महानगरात शोभावे असे हे महाविद्यालय विस्तृत , प्रशस्त आणि सुंदर तर आहेच पण ही सुंदरता वाढवण्यात येथील गुणी प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे. 1966 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला(जनता महाविद्यालय हे आधीचे नाव.) आरंभापासूनच उत्कृष्ट प्राचार्य लाभले. यामागे कॉ. बाबुजी आव्हाड मामा यांची दूरदृष्टी निश्चितच दिसून येते.गेल्या दिड तपापासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणारे प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे (गंगाधर पंढरीनाथ ढाकणे) 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने हा लेख.         प्राचार्य डॉ जी.पी.ढाकणे यांचा जन्म 1962चा.शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर तथा धावणवाडी हे त्यांचे गाव.याच गावात त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण झाले.विद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी अहमदगरच्या  महाविद्यालयात घे...

एक भन्नाट बालकविता .

इमेज

साहित्योत्सव,नवी दिल्ली

इमेज
विगत सात दशकों में मराठी साहित्य का विकास