आगामी कादंबरी -तुडवण
तुडवण ही माझी आगामी कादंबरी आहे. नुकतीच ती लिहून पूर्ण झाली. २०१२ पासून या कादंबरी लेखनात गुंतलो होतो. दरम्यानच्या काळात पीएच.डी च्या संशोधनात गुंतलो होतो. जुलै मध्ये पीएचडी चे काम अधिकृतपणे पूर्ण झाले आणि मग पून्हा तुडवण साठी पूर्ण वेळ देता आला. अर्थात अधून मधून काहीवेळ कवितांसाठी द्यावाच लागला. अनेकदा वाचनानंतर समाधान वाटेल अशी तुडवण कादंबरी पूर्ण झाली. मान्यवर प्रकाशकांनी तिला मागणी घातली आहे. आता लवकरच ती वाचकांच्या भेटीला येईल आणि वाचक तिचे कापूसकाळ प्रमाणेच स्वागत करतील अशी आशा आहे.
२०१५ व २०१६ या दोन्ही वर्षीच्या दिवाळी गंथाली दिवाळी अंकात अनुक्रमे तुडवण चा पूर्वार्ध व अखेरीचा काही भाग (जमीन नावाने) प्रसिद्ध झाला होता. वाचकांनी त्याचे खूप जोरदार स्वागत केले आहे.
तुडवण ही धडपडणारा तरूण, स्वार्थी नातेवाईक व कमालीची जिद्दी राधाक्का यांची कथा तर आहेच पण ती ढासळत्या शेती व्यवस्थेची आणि शिक्षण व्यवस्थेची वास्तवदर्शी पडझड आणि परवड देखील मांडणारी व भयावह वास्तवाला सामोरे जायला भाग पाडणारी कादंबरी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा