ऋण शेतीचे मातीचे
शेतकरी संपांला शेतकरीपुत्र व साहित्यिक म्हणून पाठिंबा दिला. लेखणी देखील चालवली. या काळात फेसबुकवर टाकलेल्या पोष्ट पुन्हा एकदा. साहित्यिकांनी धोका पत्करला पाहिजे असे वाटते.
१जुन :खबरदार माझ्या शेतकरी भावांना नावे ठेवाल तर!
आजवर तुमच्या मुर्खपणावर त्याला मौन बाळगतांना खूप त्रास झाला आहे.
१जुन :
#शेतकरी_संप =माझे मत
पहिला दिवस ( चर्चेला तयार )
शेतकऱ्याच्या एक जुटीचा फायदा घेऊन एखादा नवा नेता जन्माला यायचा प्रयत्न करील तसे होऊ देऊ नका. कालांतराने हे नेते मुजोर बणतात व शेतकऱ्याच्या प्रती असंवेदनशील होऊन सत्तेसाठी लाळ घोटत राहतात.
चर्चेसाठी शेतकरी प्रतिनिधीच असायला हवेत.
शेतमाल शेतातुनच बाहेर आणू नका. दूध वासरांना, मुला लेकरांना पाजावे, उरलेच तर विरजण घालावे.
त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला व दूध फेकावे लागणार नाही.
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतमालाची वाहतुक करू नये.
गावातील व जवळपासच्या नोकरदार वर्गास दूध व भाजीपाला फुकट व विकत देऊ नये.
एखाद्याच्या भडकावण्याने इतरांच्या मालाचे व वाहणांनाचे नुकसान करू नये.
शेतकर्यांचा लढा कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नसून व्यवस्थेशी आहे.१९६० नंतर कोणत्याही काळात शेतकरी सुखी नाही. आता त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे. विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव,मी आणि अनेक साहित्यिक मित्र गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्यांचा आवाज साहित्यातून मुखर करत आहोत.
शेतकरी असा राजा बणला आहे की स्वतः न्यायदान करण्यात ऐवजी दुसर्यांपुढे न्यायासाठी हात पसरतो आहे.
आयात निर्यात धोरण बदलवणे ही एक मागणी असावयास हवी
हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बाजारसमीत्या व सार्वजनिक व्यवस्थेला बंधनकारक असावे.
२जून:
जो राबतो शेतात त्याच्या
उरले न काही हातात त्याच्या.
नावाने निघतात फक्त योजनाच त्याच्या
सगळे मिळून खाती करतात लोच्या.
कालच्याच वाटा झाल्यात आजच्याच्या
आंदोलनांनी तरी वाटते फुटणार वाचा?!
(अपूर्ण कविता आहे. गझल नाही )
३ जून :
नावात जय त्याच्या
धनी स्वार्थी पराजयाचा
नावात सूर्य होता
अंधार जाणीवेचा
सैन्यास नाही नेता
भाबडा जाणून होता
सरणावरी कुणाच्या
वीडी पेटवीत होता.
होऊन फितूर जो रात्री
नेता बणून गेला
हे भूमिपुत्र कुणब्यांनो
समजा तो जित्ताच मेला.
सल आपलीच आपल्याशी
दवा आपलाच शोधा.
होऊ नका म्यान आता
आपुले लक्ष अचूक वेधा
बघतील काही खाण्या
टाळू वरील मेवा
लढूनी स्थान आपुले
आता अबाधित ठेवा
कैलास दौंड
४जून:
मध्यस्थी करणारे शेतकऱ्याच्या विश्वासाला पात्र नसले तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने निश्चितच सकारात्मक आणि शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष परिणाम करणारी आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा