पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाग ऐक्याची

इमेज

कविता

इमेज
प्रिय २०१७ आता थोड्याच वेळात तू बोंबलत निघून जाणार आहेस. येतानाही केला होतास तू गाजावाजा पण मी मुद्दामच दूर्लक्ष करून थेट भेटलो होतो तुला सकाळी! १९७३ पासून तुम्ही सगळे असेच हसत येता आणि रडत जाता. काय कवतीक करावं आणि का कराव? आम्ही संकल्प करायला लागलं की तुम्ही मुरक्या मुरक्या हसुन टिंगल उडवायची. आम्हीही जिद्द सोडत नाही आमची.  मिळवता येईल तेवढे मिळवतो, जळता येईल तेवढे जळतो आणि पळता येईल तेवढे पळतो. हिशोब मांडायला गेलं की रात्र पुरत नाही अन् पश्चातापाशिवाय हाती काही लागत नाही. म्हणूनच तू गेलास तरी आम्ही तुझ्या मागे पळत नाही. आता भिरभिर्या सारखा २०१८ येईल. बारा महीने फिरवत राहील. वावटळीतलं पान मी अलगद हातात झेलून घेईल. नुसत्या श्वासांचा हिशोब नाही मी युगाचं गाणं गाईन.

म.टा.

इमेज

चाक कवितासंग्रह

इमेज
□ मांग जातीच्या स्थिती गतीच्या प्रत्ययकारी चित्रणाची उत्कट सामाजिक कविता : चाक . डाॅ. कैलास रायभान दौंड   आधुनिक मराठी कविता प्राधान्याने सामाजिक आशयाची कविता आहे. कविता व्यक्तीगत भावना व्यक्त करत असली तरी तिचे व्यापक होत जाणे हेच तिचे यश असते. कवी मोहन लोढे यांचा 'चाक 'नावाचा कवितासंग्रह मे २०१० मध्ये प्रकाशित झाला.पिचल्या गेलेल्या एका समाज घटका बद्दलची कणव आणि त्याला आत्मभान देऊन जागे करण्याची धडपड या संग्रहातील कवितांच्या केंद्रस्थानी आहे. कमालीच्या अस्वस्थतेतूनच या कवितांची निर्मिती झालेली असल्याचे जाणवत राहते. 'चाक' मधील पहिल्याच कवितेत मोहन लोंढे यांच्या कविता लेखनाचे प्रयोजन आणि अपरिहार्यता अतिशय सहज सुंदर रितीने मांडली गेलेली आहे . त्यातून हा कवी स्वांत सुखाय वगैरे किंवा कलेसाठी कला या कॅटेगीरीतील कवी नसुन सामाजिक जाण आणि भान असणारा कार्यकर्ता कवी असल्याचे प्रखरपणे समोर येते . कवितेच्या शब्दाची ताकद त्याला माहिती आहे. त्यामुळेच तो मुद्दामहून रचनेला अलंकृत शब्दांचा साज न चढवता नैसर्गिक साधेपणाच्या बाजातुन कवितेला संवादी बनवतो. म्हणूनच मा...

पाथर्डी साहित्य संमेलन म.टा

इमेज

नवी कविता

इमेज
तुझ्या आठवांच्या येत घोर लाटा अस्वस्थ असा मी मनाच्या किनारी तुझ्या चाहुलीने हलतात पाने श्वासातुन गाणे ऐकतो अघोरी. तुझे रूप धुसरे स्वप्नात येता सोसतो मनाचे  वार हे दुध...

नवी कविता

इमेज
युगाच्या अस्वस्थतेला. युगाच्या अस्वस्थतेला रात्र पडते जरा कमी वादळलेल्या जगात आता हवीय त्याला कसली हमी डोळे मिटूनी सचिंत बसतो भिंतीला लाऊन पाठ मनातल्या मनात उकलतो व...

नवी कविता

इमेज
मोकळे होतसे गाणे नात्यांची भरता जत्रा खेळ कवडीचा चाले व्यथेला वारस होता भ्रमात पाळणा हाले .||१|| अंधुक स्मरते काही नेत्राशी आतले खोल जगण्याच्या ठेचांनीही अंजना लाविले ब...

नवी कविता

इमेज
मंदावले दिवे मंदावले दिवे विजेचे छताशी तम येत आहे हळू पावलाशी. धरूनीया फेर नाचते आयुष्य जीवाचे धनुष्य होत कासावीस. किती याच्या त्याच्या वाहिलेल्या चिंता आवरून घ्याव्...

१७ वे पाथर्डी साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबर

इमेज
(अध्यक्षीय भाषण : १७वे पाथर्डी साहित्य संमेलन, पाथर्डी दिनांक २३व २४डिसेंबर २०१७ ) नमस्कार सर्व साहित्य रसिक बंधू भगीनींनो,   १७ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या निमित्...