नवी कविता

तुझ्या आठवांच्या येत घोर लाटा
अस्वस्थ असा मी मनाच्या किनारी

तुझ्या चाहुलीने हलतात पाने
श्वासातुन गाणे ऐकतो अघोरी.

तुझे रूप धुसरे स्वप्नात येता
सोसतो मनाचे  वार हे दुधारी

तुझ्या स्पंदनाची झडता फुलेही
जीवाने कशाला फिरावे माघारी?

दुरातल्या घरी भेट तुझी माझी
किनार्‍यास लाट छळते तरीही .
====
डाॅ. कैलास दौंड
सोनोशी ता. पाथर्डी जि. अहमदनगर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर