नवी कविता

मंदावले दिवे

मंदावले दिवे विजेचे छताशी
तम येत आहे हळू पावलाशी.

धरूनीया फेर नाचते आयुष्य
जीवाचे धनुष्य होत कासावीस.

किती याच्या त्याच्या वाहिलेल्या चिंता
आवरून घ्याव्या सार्‍या व्यर्थ बाता.

क्षितिजात सार्‍या अंधार पाळला
डहुळला तळ उजेडाचा ओला.

उजाडेल निशा उडतील पक्षी
आयुष्याची नक्षी होत काळी नीळी .
######

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर