नवी कविता

युगाच्या अस्वस्थतेला.

युगाच्या अस्वस्थतेला रात्र पडते जरा कमी वादळलेल्या जगात आता हवीय त्याला कसली हमी

डोळे मिटूनी सचिंत बसतो भिंतीला लाऊन पाठ मनातल्या मनात उकलतो वादळाची जणू पकाट गाठ.

सारे काही हरवून गेले अंगामधले त्राणन् त्राण परी चिंतेने खुशाल भिजते मनात त्याच्या हिरवे रान.

भरले हंडे मनात त्याच्या क्षणात होती रिते रिते
श्वासांच्या हिंदोळ्यावरूनी चिंता गाती नवी गीते.

अस्थीपंजर बणुन बसला अन् छातीचा भाता हाले बालपणीचा वारा होऊनी कोंदट भिंत त्याशी बोले.
========
डाॅ. कैलास दौंड
सोनोशी ता. पाथर्डी जि. अहमदनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर