अहमदनगरचे साहित्य : एक दृष्टीक्षेप

अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान ' डॉ. कैलास दौंड ○ पूर्वपिठिका : मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाषा आहे. या राज्याच्या लगतच्या भागातही या भाषेचा वापर केला जातो. जेथे जेथे मराठीचा वापर आहे त्या त्या भागातून मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीची अधिकतर शक्यता असते . कारण संवाद साधणे हा वाङ्मय निर्मितीचा प्रमुख हेतू असतो. 'अहमदनगर जिल्ह्याचे मराठी साहित्यातील योगदान 'या विषयाच्या अनुषंगाने विचार करतांना सर्वप्रथम या जिल्ह्याच्या विस्तृत भौगोलिक क्षेत्राकडे लक्ष वेधले जाते. अहमदनगर (शहराची) स्थापना इ.स. १४९४ साली झाली. त्याही पूर्वीची काही वर्षे हे ठिकाण राजकीय केंद्र होते. नंतर निजामशाहीचेही हे केंद्रच होते .म्हणजे येथे राजसत्ता होती आणि त्या आश्रयाने वाढणारे, राहणारे लेखक, कलावंत हे देखील असणारच. आजच्या अहमदनगर जिल्ह्याबद्द्ल बोलतांना या जिल्ह्य़ातील विस्तृत भूभाग आपले लक्ष वेधून घेतो. आजही महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाचा लौकिक आहे. राज्याच...