'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता. डाॅ. कैलास दौंड

'रिंगण': सजग भावांदोलनाची कविता. डाॅ. कैलास दौंड मराठीमध्ये कविता मोठ्या प्रमाणात लिहीली जाते मात्र स्रियांची कविता तशी कमीच आहे. 'रिंगण' नावाचा कवयत्री माधुरी मरकड यांचा पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कवितासंग्रहात सत्याहत्तर कविता आहेत. फारशी पूर्व प्रकाशित नसलेली कविता 'रिंगण ' च्या रूपाने मराठी काव्यरसिकांच्या समोर आली आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे स्त्रीवादी कविता आणि दुसरा भाग निखळ भावकविता . स्रीवादी कवितांमधून कवयत्रीच्या स्रीवादी जाणिवेची क्षितिजे विस्तारत असल्याची ओळख पटवणार्या काही कविता येतात. तर निखळ भावकवितेत अन्य विविध भावानुभूतीच्या कविता येतात. यात बापाचा मृत्यू, प्रिय आई, प्रिय मुली, प्रिय आजी अशा नातेसं...