पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालकवितासंग्रह: आई,मी पुस्तक होईन.कवी डॉ ‌कैलास दौंड

इमेज
शिक्षणवसा, सण , मूल्यसंस्कार आणि पर्यावरण शिक्षणाचा आविष्कार - 'आई, मी पुस्तक होईन.' डॉ श्रीकांत श्रीपती पाटील                       म्हणजे देवाघरची फुले असे म्हटले जाते. आनंद उल्हास, उत्साह, दंगामस्ती बरोबरच शाळा आणि खेळांमध्ये मध्ये नागण्या-बागडण्यामध्ये, झाड-झाडोऱ्यात हिंडण्या फिरण्यामध्ये मुले आपला वेळ घालवतात. राग, लोभ, मोह,  मत्सरापासून दूर राहून मुले आपली निरागसता आणि निष्पापता जपतात. आई वडिलांइतकेच आपल्या शाळामाऊलीवर व गुरुजींवर प्रेम करतात. शाळेमध्ये पुस्तकातील अक्षरे गिरवितात तर निसर्गाच्या उघड्या शाळेमध्ये हिंडुन फिरून डोंगर दऱ्याचे, झाडाझुडपांचे, फळाफुलांचे, पक्षी-प्राण्यांचे निरीक्षण करून आपली जिज्ञासा तृप्ती करून घेतात.        तुम्ही कोण होणार ? असा प्रश्न मुलांना नेहमीच कुटुंबात, शाळेत, समाजात विचारला जातो. बऱ्याचदा लोक कौतुक करतील अशी उतरे मुले या प्रश्नाला देतात. मी फौजदार होईन, मी कलेक्टर होईन अशी उतरे देवून आपल्या निरागस मनाची आनंदलालसा पूर्ण करतात. पण खरेच लहानपणी दिलेली उत्तरे ही पाठ केल...

आई ,मी पुस्तक होईन : बालकवितासंग्रह परीक्षण

इमेज
• जगण्याचे भान देणारा कवितासंग्रह 'आई मी पुस्तक होईन'                     उत्तम सदाकाळ                   'आई मी पुस्तक होईन' हा डॉ. कैलास दौंड यांचा नवाकोरा बालकवितासंग्रह नुकताच हाती पडला. बघताक्षणी कवितासंग्रहाने लक्ष वेधून घेतले. कवितासंग्रहाचे शिर्षकच एक अनोखी ध्येयदिशा दाखविणारे आहे. पुस्तक होवून जगाला सुजाण करणाऱ्या बालमनाचे ते प्रतिबिंब मला कवितासंग्रहात डोकावण्यास अधिर करत होते,हे ही तितकेच खरे! त्यातच हा बालकविता संग्रह डॉ. कैलास दौंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलाय ही गोष्टही कवितांचा आस्वाद घ्यायला माझ्या मनाला उत्सूक करत होती.          डॉ. कैलास दौंड म्हणजे साहित्य क्षेत्रातले प्रतिष्ठा लाभलेले सुपरिचित नाव. त्यांच्या सर्वांगसुंदर व बहुआयामी लेखनाने वाचक, समिक्षक व अभ्यासक या सर्वांवर गारुड केलेले आहे.            डॉ. कैलास दौंड यांची 'गोधडी' ही कविता इयत्ता आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. यावरूनच त्...

डॉ ‌कैलास दौंड यांचे बालसाहित्यातील योगदान

इमेज
माझे गाणे आनंदाचे‌ हा डॉ.कैलास दौंड यांचा बालकविता संग्रह २०२० मध्ये प्रकाशित झाला आहे. त्या आधी ते किमान तीस वर्षांपासून कविता लेखन करत आहेत. त्यांची.  ' गोधडी' ही कविता महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता आठवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे . त्यांच्या काही कविता आणि बालकथाही किशोर मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. बालसाहित्य विषयक दिवाळी अंकातूनही त्यांच्या अनेक बालकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'आई,मी पुस्तक होईन'   हा बालकवितासंग्रह २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात प्रकाशित झाला. त्याला अल्पावधीतच बालवाचक आणि समीक्षकांनीही मोठा प्रतिसाद दिला. कारवार (कर्नाटकचे) कवी संदेश बांदेकर यांनी या बालकवितासंग्रहातील सर्व कवितांचा कोंकणी भाषेत अप्रतिम अनुवाद केलेला आहे. जाणीवांची फुले हा डॉ.कैलास दौंड यांचा बाल कथासंग्रह २०२१ मध्ये प्रकाशित झाला. यातील बहुतांश बालकथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या किशोर मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही बालसाहित्यकृतींची समीक्षकांनी व जाणकारांनी उत्त...

असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी

इमेज
•असं सपान पडलं,पंढरीला गेल्यावाणी पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भेटीची ओढ सश्रद्ध मराठी मनाला लागून असते. या दैवताचा मानवी नात्याच्या पातळीवरही इथले लोकमन लोकगीतातून‌ व्यक्त झालेले आहे. कितीतरी लोकगीते, स्रियांच्या ओव्या यातून लोभस रुपात पंढरपूरच्या कथा अनुभवायला मिळतात. आपल्या दररोजच्या जगण्यातील पती पत्नीच्या नात्यातील लुटूपुटूच्या भांडण्याचा अनुभव आपल्या आवडत्या देवाच्या जीवनात घडू शकतो अशी कल्पना लोकसाहित्यातील कथा आणि गीतांमधून आलेली आहे. रुक्मीणी विठ्ठलाला म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या भक्तांकडेच अधिक लक्ष देता,त्यांनाच अधिक वेळ देता‌ त्यामुळे मी रागाने रुसून जाईन. मग तर तुम्ही मला शोधाल पण काही सापडणारे नाही त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पंढरपूरात माझा शोध घेत हिंडावे लागेल. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या नात्यातील गोडवा मानवी पातळीवर आणून त्याला लोभस ओवीरूप लोकांनी दिले आहे. ते असे-     ' रुक्मीण म्हणती देवा,मी गं रुसून जाईन       अवघी पंढरी तुम्हा ,धुंडाया लावीन.' तर पंढरपूरात संत जनाबाईचा तवा चोरीस गेला असून त्याच्या शोधासाठी संत न...

भाऊबीजेची ओवाळणी

भाऊबीजेची ओवाळणी दिवाळीच्या नंतर बलिप्रतिपदा आणि लगोलग भाऊबीज येते. या दिवशी बहीण तिच्या बंधूराजाला ओवाळते. कार्तिक महिन्यातील ही शुद्ध द्वितीया. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातांना दिसतो तसे बहीण भावातील प्रेमानुबंध वर्धिष्णू होत जातात. भाऊबीजेच्या सणाला बहिणीला माहेराची ओढ निर्माण होते. ती आपल्याला माहेरातून बोलावणे येईल याची वाट पाहू लागते. मुलीला आणायला जाणाऱ्या व्यक्तीला 'मुराळी'(मुऱ्हाळी) म्हणतात. बऱ्याचदा भाऊकडेच ही जबाबदारी असे. अशा मुऱ्हाळ्याची वाट पाहणाऱ्या बहिणीची भावना स्रियांच्या ओवीतून व्यक्त झाली आहे. ती म्हणते -   ' साऱ्या सणामंदी सण दिवाळी गं आनंदाची ।    नेणत्या बंधूची गं ,वाट पाहते गोईंदाची ॥' त्याची वाट पाहता पाहता कधी तो फोन करून माहेरी बोलवील तर कधी स्वतः बहिणीच्या गावी जाऊन तिला घेऊन येईल. मात्र बहिणीच्या कल्पनेत तो तिला न्यायला आलेला असतो. तो भाऊ मायाळू असतो. तो आर्थिक स्थितीने कसाही असो तिच्यालेखी तो श्रीमंत असतो. अशावेळी बहिणीच्या मुखी लोकगीतातील पुढील ओवी सहजच येई. '' भाऊबीजाच्या गं दिसी भाऊ बहिणीच्या देशाला । माझ्या गं बंधवाच्या मोती ...

दिन दिन दिवाळी

इमेज
दिन दिन दिवाळी  पूर्वी खेडेगावात अनेक लोकांच्या घरी गाईगुरे असत. सण आणि उत्सवात गाईगुरांची, वासरांची, बैलांची पूजा केली जाई. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाई. दिवाळी सणातील द्वादशीला 'वसुबारस' असे नाव आहे; वसुबारशीलाच काही भागात 'वाघबारस' म्हणूनही ओळखतात. तेथे वाघदेवाची पुजा केली जाते. पुजा केल्यावर तो आपल्या गुरावासरांचे रक्षण करतो असा श्रद्धाभाव असतो. जेथे पशुपालन अधिक प्रमाणात केले जाते अशा ठिकाणी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारशीच्या आधीच तीन-चार दिवस गावातील मुले वसुबारसीच्या तयारीला लागत. म्हणजे गाईला आणि तिच्या वासराला आनंदाने आणि कृतज्ञतेने ओवाळण्यासाठी मुले काकडा तयार करण्याच्या कामाला लागत. काकडा कापसाचे पलिते तयार करून ते तेलात बुडवून देखील तयार केला जाई. परंतु एरंड किंवा बिलाईत यांच्या बियांचे वरील सालपट काढून आतील भाग एका तारेला गुंतून अनेक बियांचा काकडा तयार केला जाई. तो लवकर पेट घेई. आणि बराच वेळ जळत राही. शिवाय त्यासाठी घरातील कापूस व तेलही खर्च होत नसे. एका अर्थाने तो काकडा इकोफ्रेंडली होता म्हणा हवं तर! तो काकडा घेऊन काही मुले गायी व वासरांच्या...

डॉ ‌कैलास दौंड : अल्प परिचय|| मराठी भाषिक लेखक,कवी|•

                        परिचय पत्र    डॉ. कैलास दौंड •पूर्ण नाव:  डॉ. कैलास रायभान दौंड • जन्म दिनांक: १/०६/१९७३ • पेशा - शिक्षक  •शिक्षण : एम. ए. (मराठी), बी.एड., डी.एड., पीएच.डी., नेट (मराठी). •शाळेचा पत्ता : जि.प.प्रा.शाळा : हंडाळवाडी या.पाथर्डी जि.अहमदनगर.पिन 414102  •कायमचा पत्ता : मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन 414102 Email address: kailasdaund@gmail.com •भ्रमणध्वनी: 9850608611 •शैक्षणिक पात्रता      परीक्षा/पदवी.             उत्तीर्ण वर्ष                   बोर्ड /विद्यापीठ  S.S.C.                  २१/०६/१९८८.               S.S.Cपुणे बोर्ड   D.Ed                   २९/०७/१९९१.               शासकीय परीक्...

जाणिवा लोकसंचिताच्या

इमेज
कष्टाच्या सहनशीलतेची गाथा : जनी         गंगाखेडची जनाबाई दामाशेटी यांच्याकडे राहीली.तिथे तिने दळणकांडण करणे, गोवऱ्या वेचणे अशी कष्टाची कामे केली.दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील. जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' असे म्हणून घेते. कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल तिची कधीही ,काहीही तक्रार नव्हती. तिचे मन आणि चित्त विठ्ठल भक्तीत रममाण झालेले होते. प्रत्येक कामात माझा विठ्ठल मला मदत‌ करतो अशी तिची भावना होती. 'झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी '  अशी तिची श्रद्धा अभंगातूनही व्यक्त झालेली आहे. महाराष्ट्रातील स्रियांची संत जनाबाई आजही लाडकी आहे. तिची सोशिकता, श्रद्धा आणि भक्तीभाव सर्वांना चकित करून जातो. संत जनाबाई या नावाभोवती अनेक आख्यायिकांचे वलय आहे. त्याचे कारण तिची विठ्ठलभक्ती आहे. मराठी लोकसाहित्यामध्ये संत जनाबाईचे अढळ स्थान आहे. संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीने लोकमानसाने साक्षात विठ्ठलालाही माणूस पातळीवर आणले आणि ओव्यांमधून गाईले. एका ओवीत श्रीविठ्ठल त्यांच्या राहीला समजावतांना दिसतात -        ...

कवितानुवाद

इमेज
प्रसिद्ध साहित्यिक आणि अनुवादक संदेश बांदेकर  कवितानुवाद कोंकणी भाषिक कवी संदेश बांदेकर (मूळ मराठी कविता : डॉ ‌कैलास दौंड) १)तळ्यां उदाक (तळ्याचं पाणी)  तळ्यांचे उदाक निळेशार वारो सुध्दा थंडगार दोंगरातल्यान येवन मोड उदकाक म्हणता म्हाक पळय उदाक कायीत उलयना तळ्यात पडतेत रावता मोडाक मात ओगीत घाई उदकाचो हारसों फुटना काय मोड ओगीत पिसावलें झगडे करुक लागले झाडा लागली हांसुक  मोडाक लागली चाळोवुक मोडाले आता चाळवले जिगोळवणे सुरु जाले मोड मोडाक मेळ्ळे पावस जावन पडले उदा धावले शेता केरात व्होळान सांणले भान उदा सगळे एक जाले पशु पक्षी आंनदुन गेले २) मधुकर आई म्हणता म्हाका तळहातावयलो फोड आका म्हणता लाडान साखरेकिंता गोड आजी म्हणता केन्नकेन्ना दुदावयली साय आजो म्हाक आपयता  छोटा मुन्ना भाय बाब आपयत म्हाका स्मार्ट आमगेल दिवटो दोस्त म्हणात मोगान येयलो तांबडो बावटो मावशी सांगता फोनार रेजेक यो रे बाळा मास्तर म्हणता  मधुकर चुकय नाका शाळा ३)चला पोरांनो शाळेक.  कोरोनाक भिवन आमगेलो कीतलो काळ गेलो नियम पाळन्न चला पोरांनो चला पोरांनो शाळेक आँनलायनाचो आमकां येयलो कितलो तरी ...

बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन

इमेज
बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन गुलाब बिसेन, सितेपार - तिरोडा, जि. गोंदिया बालकविता आणि बालकथांच्या माध्यमातून बालसाहित्यामध्ये आपल्या वेगळी ओळख निर्माण केलेले साहित्यिक डॉ. कैलास दौंड हे मुलांसाठी सतत नाविण्यपूर्ण साहित्य निर्मिती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलांसाठी  'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले' अशी दोन पुस्तके लिहिलेली आहेत. नुकताच त्यांचा 'आई, मी पुस्तक होईन' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे. कवी डॉ. कैलास दौंड हे ग्रामीण साहित्यिक असल्यामुळे साहजिकच त्यांच्या बालसाहित्यातही ग्रामिण जीवनाचे, अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. हाच धागा पकडून त्यांनी आपल्या कवितांतून समृद्ध अशा ग्रामीण जीवनाशी बालकुमारांची नाळ जोडण्याचाही प्रयत्न केलेला दिसून येतो.  डॉ. दौड यांच्या या कवितासंग्रहाची सुरुवात  'आहे माझे रान'  कवितेने झालेली आहे.  ' डोंगराच्या पुढे   आहे माझे रान   हिरव्या रंगांत   हरपते भान' या कवितेच्या ओळी वाचकाला निसर्गाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कवीचे मन गावात रमणारे...

सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह

इमेज
सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह संपूर्ण महाराष्ट्राला बहुविध लेखन प्रकार हाताळणारे साहित्यिक म्हणून सुपरिचित झालेले नाव म्हणजे डॉ. कैलास दौंड. त्यांचा अलिकडेच प्रकाशित झालेला 'आई मी पुस्तक होईन' हा बालकवितासंग्रह वाचनात आला. या आधी त्यांचे अनेक कवितासंग्रह , कथासंग्रह, कादंबरी, ललित लेखसंग्रह, बालसाहित्यामध्ये सुध्दा बालकाव्यसंग्रह, बालकथासंग्रह असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांची सारी साहित्यसंपदा ही उद्बोधक, उत्तम, वाचनीय अशीच आहे. तसाच' आई,मी पुस्तक होईन 'हाही बालकवितासंग्रह हा मुलामुलींसाठी खरोखर संस्कारक्षम, रंजक व बोधप्रद असाच आहे.    'आई,मी पुस्तक होईन' या बालकवितासंग्रहातील पहिल्याच 'आहे माझे रान' या  कवितेतील बालक रानात रमता रमता शेतशिवारातील पिके बघून आपले भान हरपतो आणि दुःख विसरतो. ग्रामीण भागातील मुले शेतीशी किती तल्लीन झालेली असतात हे या कवितेतून दिसते. अशाच प्रकारचे बालकाचे समरसतेचे विचार 'जेव्हा' या कवितेतही  'पाहुनिया सृष्टी नवी, येते अंगी तरतरी ।।'  असे...

लक्षवेधी समीक्षा : बालसाहित्याचे वर्तमान.

इमेज
लक्षवेधी समीक्षा : बालसाहित्याचे वर्तमान. इ.स.२००० नंतर मराठी बालसाहित्य निर्मितीचा ओघ वाढल्याचे चित्र आहे. अनेक लेखक कवींनी बालसाहित्यात कविता, कथा व क्वचित कादंबरीही लिहून भर टाकली आहे; मात्र त्या मानाने या बालसाहित्याची म्हणावी तेवढी समीक्षा झाली नाही. बालसाहित्याची समीक्षा करणारी पुस्तके अत्यल्प प्रमाणातच प्रकाशित झाली. या पार्श्वभूमीवर कवी, कादंबरीकार आणि बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. कैलास दौंड यांचे लक्षवेधी ठरणारे 'बालसाहित्याचे वर्तमान' हे समीक्षेचे पुस्तक नुकतेच अहमदाबादच्या शॉपीजनने प्रकाशित केले आहे.      'बालसाहित्याचे वर्तमान' हे पुस्तक 'बालसाहित्याप्रती आस्था असणाऱ्या असणाऱ्या सर्वांना' त्यांनी अर्पण केलेले आहे. अर्थातच यातील सर्व लेखांना पुरेशी वाचनीयता देखील लाभलेली आहे. अभ्यासक, समीक्षक आणि बालसाहित्यिकांना हे लेख वाचून आनंद व दिशा मिळेल .तसेच अगदी किशोरवयीन वाचकही या पुस्तकामुळे वाचनाकडे वळायला मदत होईल. 'बालसाहित्याचे वर्तमान' या पुस्तकात एकूण अठरा लेख आहेत. त्यातील पहिला लेख आजच्या बालसाहित्यावर एक झोत टाकणारा...