ऋषी पंचमी विशेष
दुरून दिसणारा सातलिंग्या डोंगर
ऋषी पंचमी विशेष
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सोनीशीच्या पूर्वस सातलिंग्या नावाचा डोंगर आहे. याच्याच काही भागाला धारागिरी, मावलयाटोक अशी नावे आहेत. अर्थात सातलिंग्या आणि आसपासचे सगळेच डोंगर बालाघाट डोंगर रांगेचा भाग आहेत. सातलिंग्या आणि धारागिरी डोंगरांचा पूर्व भाग शेवगाव तालुक्यातील कोनोशी , राणेगाव हद्दीत येतो.
सातलिंग्या 🗻डोंगरावर सात टेकड्या आहेत. सर्वात मोठ्या टेकडीला हत्तीखिळा म्हणून ओळखले जाते. या टेकड्यांवर मोठमोठे दगड आहेत. या ठिकाणी प्राचीन काळी सप्त ऋषी तपश्चर्येला बसत असत अशी आख्यायिका आहे.
हे सप्त ऋषी म्हणजे धौम्य ऋषी, मातंग ऋषी, भारद्वाज ऋषी, गलंड ऋषी, शृंग ऋषी, पाराशर ऋषी, वाल्मिकी ऋषी.
सातलिंग्या च्या परीसरात जी अन्य गावे आहेत त्यापैकी काही ठिकाणी या ऋषींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. त्या गावांची नावे ऋषींच्या नावावरून तयार झाल्याचे बोलले जाते.
धुम्यागड म्हणजे आत्ताचा भगवानगड (धौम्य ऋषी)., मातोरी (मांतग ऋषी), भारजवाडी (भारद्वाज ऋषी), गोळेगाव (गलंड ऋषी), शिंगोरी (शृंग ऋषी), पारगाव (पाराशर ऋषी), काशीकेदार- नागलवाडी( वाल्मिकी ऋषी) , नागलवाडी या ठिकाणी ऋषी नागार्जुन यांची रसशाळा होती असेही काही संशोधक मानतात. महानुभाव पंथीयाचेही हे स्मृतिस्थळ आहे.
ऋषी पंचमीच्या निमीत्ताने ऋषींचे स्मरण !
ऋषींची छान माहिती
उत्तर द्याहटवा