जाणिवांची फुले


जाणिवांची फुले  - पाठराखण
 ISBN 9788194817239


डॉ. कैलास दौंड हे सतत प्रयोग करणारे बालसाहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचा 'जाणिवांची फुले' हा बालकथासंग्रह म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच आहे. बालसाहित्य हे संस्कार करण्याचे एक प्रभावी साधन आहे
मुलांच्या मनाला आनंदित करणारं साहित्य त्यांचा हाती देणं त्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक विकासासाठी आवश्यक असतं. नव्या पिढीतील मुलांचे भावविश्व ओळखून त्याला कथेत गु़ंफण्यात डॉ. कैलास दौंड यांचु लेखणी यशस्वी झाली आहे, हे या कथा वाचताना लक्षात येते. मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांची विचारप्रक्रिया गतिमान करणाऱ्या या सोळा कथा आहेत. या संग्रहातील प्रत्येक कथा एक मूल्य घेऊन येते. संस्कारक्षम वयात अशा कथा जगण्याला उभारी तर देतात;सोबतच मुलांच्या मनाला कल्पनेचे पंख देण्याचे कामदेखील या कथा करतात. हा कथासंग्रह उमलत्या मनात जाणिवांची बीजे रोवतानाच आनंदाचा सुगंधदेखील देऊन जाईल हा विश्वास वाटतो. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून या पुस्तकाचे नक्की स्वागत होईल. यापुढेही लेखकाच्या हातून मराठी बालसाहित्यात भर घालणारे सर्जनशील साहित्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. पुढील लेखनास खूप साऱ्या शुभेच्छा! 

किरण केंद्रे
संपादक
'किशोर', बालभारती, पुणे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर