ज्ञानोबा तुकोबांनी वर्णन केलेला गणपती आणि त्यांमागील भूमिका!


 गणपती हा वेदाने वर्णन केलेला देव. आद्यपुजेचा मानही गणपतीचाच. शंकराला भजणाऱ्या शैव सांप्रदायिकांना गणपती विशेष प्रिय. त्यामुळे आपल्या भगवान विष्णूंची भक्ती करणाऱ्या वैष्णव संतांनी श्री गणेशाला शंकराचे रूप मानुन आपल्या वाणीतून आणि लेखणीतून समाजासमोर ठेवले. हरीहराला प्रिय असलेला हा देव. 
         ||  १||
अकार चरण युगुल।
उकार उदर विशाल।
मकार महामंडले।
मस्तकाकारे।
हे तिन्ही एकवटले।
तेच शब्द ब्रम्ह प्रगटले।
ते मियांसी गुरुकृपा नमिले आदिबीज।
   -संत ज्ञानेश्वर
            ||२||
 ओंकार प्रधान रूप गणेशाचे
 ते हे तिन्ही देवाचे जन्मस्थान

अकार तो ब्रम्ह, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेजा

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप. 

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचिया. 
         - संत तुकाराम. 

यामागे वारकरी( वैष्णव)  संतांची शैव आणि वैष्णव ऐक्याची  भूमिका दिसून येते. 
   हरीहरा भेद नाही
   नका करू वाद
   ही संतांची शिकवण आहे. त्याचीच परीनीती म्हणून आता शैव आणि वैष्णव एकोपा पहावयास मिळतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर