शिक्षणयात्री नरेंद्र गौतम
नरेंद्र गौतम यांचा समाजसहभागाचा ‘खर्रा’ पॅटर्न! नरेंद्र गौतम हे उच्च विद्या विभूषित शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा केंद्र भानपूर( ता.जि.गोंदीया) या शाळेत पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झालेली असून शाळेची एकूण पटसंख्या १५३ व शिक्षक संख्या सहा आहे. शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक समस्यावर मात करता येऊ शकते आणि शाळेचा विकास साधता येतो. मात्र स्वतःच्या कामासोबतच पालकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. या विचारांनी नरेंद्र गौतम यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी पाहिले की या शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती साधारण होती मात्र हे विद्यार्थी खेळात निपूण होते. सन २०१८-१९ मध्ये इयत्ता पाचवीचे अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले. नियमित अध्यापन,सराव आणि अनुधावन यामुळे त्यातून दहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन केळापूरसाठी निवडही झाली. प्रयत्नातील सातत्यामुळे प...
Khup chhan
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवा