विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या: कीर्ती काळमेघ-वनकर. कीर्ती काळमेघ-वनकर या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राच्या अध्यापिका आहेत. नांदगाव खंडेश्वर सारख्या यवतमाळ ते अमरावती दरम्यान असणाऱ्या ग्रामीण भागात काम करत असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल अनेक अडचणी आणि समस्या आढळून आल्या. हे विद्यार्थी सामाजिक भान, कुटूंबातील सदस्यांना समजावून घेण्याची कुवत, परीसराचे आणि निसर्गाचे आकलन, व्यसनाचे दुष्परिणाम इत्यादी बाबतीत सजग नसल्याचे त्यांना आढळून आले.त्यावर त्यांनी त्यांच्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ‘इच्छा तिथे मार्ग’ या सूत्राने त्यांनी विद्यार्थ्यांच्या जाणिवा विकसित करण्याचा मार्ग शोधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन आणि डोळस समाज निरीक्षण याच्या अभावामुळे अनेक साधारण वाटणाऱ्या गोष्टी देखील माहिती नसतात. अनेकांना तर दहावी पास होऊन देखील नीटनेट...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा