पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परिचय

इमेज

गोश्ट प्रवासांंक न गेल्ल्या पोरांली

इमेज
• गोश्ट प्रवासांंक न गेल्ल्या पोरांली         सदूक इतले आंनदी जावचे काय कारण नाशिले.शाळेत पयल तासाकत सरांन आमगेल प्रवास वेरुळ हांग वयतल म्हण सांगिले.गेल वर्सा तेमगेल प्रवास भीमाशंकर हांग गेल्लो.त्या वेळार केल्ली मज्जा,पळयीलो निर्सग ,झाडांचेर पळयील्ली शेकरु जातीची च्यानी हे सगळे आता दोळ्यां मुखार येवु लागीले.ह्या वर्सा बी प्रवासां वयतल म्हण तो आनंदातत घर येयीलो.           सांजेर केन्न एकपटी आईबाबा शेतातल्यान घर येता आनी तेमकां प्रवासा बद्दल सांगता अश जाल्ले.तो त्या विचारातच आंगणात भुगोलाचे पुस्तक काडन्न बशीलो.वेरुळाक वयताना खंचखंचे गांव लागतात ते तेकां सोदु जाय आशिले.थोडे वेळान तेगेल आवय बापुय शेतातल्यांन येयले.तेमी हात पाय धुले ना धुले अश कन्न तेमी बसताना तेणे सांगले.     " दादा,ह्या पटी आमगेल शाळेचो प्रवास वेरुळाक वयचो आसा.चारशी रुपय फी दवरला." सदून सांगले.तो बापायक दादा म्हणतालो            सदूल्या उलौवण्याचेर दादा काय उलयनास्तना गप्प रावलो.सदूक दिसले दादान आयकलना जाणकोण.परत सांगु केल तशी दादान सा...

जगण्यामध्ये आणूया. (बालकविता)

इमेज
जगण्यामध्ये आणूया.  शाळेमध्ये शिकतो जे ते जगण्यामध्ये आणूया ज्ञानाचा वापर करुनी जीवन सुंदर बनवूया.  शाळेमध्ये शिकतो भाषा,  भाषेमधले व्याकरण सुयोग्य तिचा वापर करता वादाला मग कसले कारण?  वर्गामध्ये गणित शिकतो आकडेमोडही करीतो फार  जीवनामध्ये वापर करता शिल्लक राहतील पैसे चार!  बाहू स्फुरुनी इतिहास घोकतो युद्ध, लढाया तोंडपाठ गतकाळातील चुका टाळुनी मान ठेऊया सदैव ताठ.  नकाशातुन भूगोल शिकतो सागर, डोंगर, जंगल, घाट भान तयाचे राखुन चालुया जीवनाची या पाऊलवाट.  निष्कर्ष काढतो प्रयोग करूनी विज्ञानाचा घेतो धडा जगण्याला अति सोपे करण्या ज्ञानाचा तू ओत घडा.  शाळेमध्ये शिकतो आपण कला, खेळ नि कार्यानुभव वापर त्याचा सदैव करता जगणे होते रम्य अनुभव.  विविधतेने नटला आहे सभोवताली समाज सारा त्या बागेचे फूल होऊनी सुंदर सजवू भारत प्यारा ~~~~ डॉ. कैलास दौंड (टीप : चित्रे प्रतिकात्मक आहेत. त्यावर आमचा हक्क नाही) 

आगंतुकाची स्वगते' :अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: • डॉ. दीपक सूर्यवंशी

इमेज
    • अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: 'आगंतुकाची स्वगते'                                  •  डॉ. दीपक सूर्यवंशी              मराठी साहित्यातील प्रतिथयश कादंबरीकार आणि कवी डॉ. कैलास दौंड यांचा 'आगंतुकाची स्वगते' हा पाचवा  ग्रामीण जीवनानुभवाशी एकरूप असलेला पाचवा कवितासंग्रह.  यात  अस्वस्थ सभोवतालचे दर्जेदार नि अस्सल, प्रत्ययकारी चित्रण आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहाची कवीने पहिल्या विभागात 'सल आणि ओल', दुसऱ्या 'नदीकाठ' तर तिसऱ्या विभागात 'दिस-मास’ अशा तीन भागात विभागणी केली असून त्यात अनुक्रमे आपल्या अस्वस्थ सभोवतालचे चित्र पाहून हेलावणाऱ्या मनाची अवस्था, महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून प्रगत जाणिवांच्या दिशेने होणारी वाटचाल आणि याच विचारांच्या माध्यमातून सद्यकाळात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल भविष्यात तरी करता येईल का...

बालसाहित्य balsahitya

इमेज

तीर्थरूप ढगास...

इमेज
तीर्थरूप ढगास  पावसाचं मुळी थांबेना सत्र ढगोबाला लिहिलं पत्र मायना लिहीला, तीर्थरूप ढगास!  आता आम्हाला पाऊस बस्स!  घरं आमची पडायला लागली पीकं देखील सडायला लागली  नद्या नि नाले तुडुंब भरले कणसांना बघ कऱ्हे फुटले.  तुला हे का दिसत नाही तरी तू का थांबत नाही?  लवकर निघून जाण्याची आता तरी कर बाबा घाई!  दूर दूर निघून जा जिथे तुझी वाट पाहतात पाऊस टाक त्यांच्या हातात पीकपाणी येऊ दे शेतात.  ढगोबा तू मायाळू आहेस लोक तुझी पाहतात वाट कमी अधिक पडलास तर आमची लागते पुरती वाट!  पत्र लिहिले प्रेमाने राग मनी धरू नकोस पुढल्या वर्षी मात्र मला वाट पहायला लाऊ नकोस!  पत्र लिहून झालं पुर्ण झालं ड्राफ्टमधी जमा झालं मग माझ्या ध्यानी आलं क्लाऊडमधी पाठवून दिलं!  ~~~~

चला मुलांनो शाळेला

इमेज

२ ऑक्टोबर, म. गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

इमेज

अंबादास बडे

https://youtu.be/99ucnOuhQS8

माझ्या मुली👭 ||जागतिक कन्यादिन

इमेज

लोभस 🌿🍃निसर्ग रूपे

इमेज

मौलिक शिकवण देणारा बालकथासंग्रह 'जाणिवांची फुले'.

इमेज
         • मुलांना मौलिक शिकवण देणारा बालकथासंग्रह 'जाणिवांची फुले'.                              प्रा. देवबा पाटील.                  पूर्वीच्या काळी जरी वाचनसंस्कृती जास्त विकसित झालेली नव्हती तरी एकत्र कुटुंबपध्दती असल्यामुळे मुलामुलींना दररोज रात्री झोपण्यापूर्वी आजीकडून एखादी मनोरंजक गोष्ट हमखास ऐकायला मिळायची तर आजोबांकडून एखादा व्यावहारीक धडा शिकायला मिळायचा. त्यातून कळत नकळत त्यांच्या बालमनावर सुसंस्कार घडायचेत जे भावी काळात त्यांच्या कामी यायचेत. आजच्या विभक्त कुटुंबपध्दतीत मुलेमुली आजीआजोबांच्या ह्या सुंदर व रमणीय गोष्टींना मुकली आहेत. परंतु आजच्या काळातील अनेक बालसाहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारची बालसाहित्याची पुस्तके लिहून ही उणीव दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, करीत आहेत. अर्थात पालक किती जागरूक आहेत व अशी जीवन ...

ममताआजी आणि स्विटी चिमणी

इमेज
                 • ममताआजी आणि स्विटी चिमणी              महापूरानं गावालाच कवेत घेतलं होतं. हळूहळू तो ओसरू लागला तसतश्या अनेक गोष्टी दिसु लागल्या. पाण्यात बुडालेली झाडे झुडपे पाण्याबाहेर येतांना दिसु लागली, नदीकाठच्या घरातील पाणी ओसरू लागले. महापूरच तो त्याने घरे, पाळीव प्राणी, पक्षी, पीके यांचे अतोनात नुकसान केलेले होते. काही माणसांना त्याने जसे बेघर केलेले होते तसेच कित्येक पक्ष्यांनाही त्याने बेघर केलेला होते. अशाच पक्ष्यांपैकी एक होती स्विटी चिमणी.                 नदीच्या काठावर असलेल्या झुडपात अनेक पाखरांनी घरटी केलेली होती. भक्षांची उपलब्धता, सावली, पाण्याची सोय यामुळे या झुडुपात नेहमीच अनेक पाखरांचे आवाज ऐकू येत असत. स्विटी चिमणीचे घरटेही अशाच एका झुडुपाच्या फांदीला होते. एक महिन्यापूर्वीच तीने ते खुप मेहनत घेऊन तयार केलेले होते. विणीचा हंगाम असल्याने तिने त्यात तीन अंडीही घातलेली होती. ती पांढऱ्या रंगांची अंडी खुप सुंदर दिसत आणि इतरांचे ल...

दुखरी सल

इमेज

शाळा 🏫उघडण्याची उत्सुकता

इमेज
भरू दे शाळा

जाणिवांची फुले

इमेज
जाणिवांची फुले  - पाठराखण  ISBN 9788194817239 डॉ. कैलास दौंड हे सतत प्रयोग करणारे बालसाहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचा 'जाणिवांची फुले' हा बालकथासंग्रह म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच आहे. बालसाहित्य हे संस्कार करण्याचे एक प्रभावी साधन आहे मुलांच्या मनाला आनंदित करणारं साहित्य त्यांचा हाती देणं त्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक विकासासाठी आवश्यक असतं. नव्या पिढीतील मुलांचे भावविश्व ओळखून त्याला कथेत गु़ंफण्यात डॉ. कैलास दौंड यांचु लेखणी यशस्वी झाली आहे, हे या कथा वाचताना लक्षात येते. मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांची विचारप्रक्रिया गतिमान करणाऱ्या या सोळा कथा आहेत. या संग्रहातील प्रत्येक कथा एक मूल्य घेऊन येते. संस्कारक्षम वयात अशा कथा जगण्याला उभारी तर देतात;सोबतच मुलांच्या मनाला कल्पनेचे पंख देण्याचे कामदेखील या कथा करतात. हा कथासंग्रह उमलत्या मनात जाणिवांची बीजे रोवतानाच आनंदाचा सुगंधदेखील देऊन जाईल हा विश्वास वाटतो. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून या पुस्तकाचे नक्की स्वागत होईल. यापुढेही लेखकाच्या हातून मराठी बालसाहित्यात भर घालणारे सर्जनशील साहित्य नि...

माझ्या शाळेने मला काय दिले?

इमेज

ऋषी पंचमी विशेष

इमेज
दुरून दिसणारा सातलिंग्या डोंगर ऋषी पंचमी विशेष            अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सोनीशीच्या पूर्वस सातलिंग्या नावाचा डोंगर आहे. याच्याच काही भागाला धारागिरी, मावलयाटोक अशी नावे आहेत. अर्थात सातलिंग्या आणि आसपासचे सगळेच डोंगर बालाघाट डोंगर रांगेचा भाग आहेत. सातलिंग्या आणि धारागिरी डोंगरांचा पूर्व भाग शेवगाव तालुक्यातील कोनोशी , राणेगाव हद्दीत येतो.         सातलिंग्या 🗻डोंगरावर सात टेकड्या आहेत. सर्वात मोठ्या टेकडीला हत्तीखिळा म्हणून ओळखले जाते. या टेकड्यांवर  मोठमोठे दगड आहेत. या ठिकाणी प्राचीन काळी सप्त ऋषी तपश्चर्येला बसत असत अशी आख्यायिका आहे.        हे सप्त ऋषी म्हणजे धौम्य ऋषी, मातंग ऋषी, भारद्वाज ऋषी, गलंड ऋषी, शृंग ऋषी, पाराशर ऋषी, वाल्मिकी ऋषी.            सातलिंग्या च्या परीसरात जी अन्य गावे आहेत त्यापैकी काही ठिकाणी या ऋषींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते.  त्या गावांची नावे ऋषींच्या नावावरून तयार झाल्याचे बोलले जाते.  ध...

🌜👦 महान स्वप्न

 ☁️🌜👦  महान स्वप्न एके रात्री स्वप्न मला पडले खुप महान चंद्र आला जवळ माझ्या होऊनी खुप लहान.  उजेड होता शितल त्याचा  स्पर्श होता मऊमऊ प्रेमाने मजशी वदला दोघे आपण भाऊभाऊ.  हळूहळू तो होत मोठा पाठीवरती बैस म्हणाला खुल्या आभाळी सैर करण्या तुजला मी नेईन वदला.  मी ही बसलो पाठी त्याच्या सफर झाली आमची सुरू उंचावरूनी खाली पाहता डोळे लागले माझे फिरू.  "वरती पहा ग्रह तारे जग अनोखे लुकलुकणारे" कुतूहल नवे सांगत होता चंद्र नभातील भिरभिरणारे.  अवचित मग खाली बघता तोल गेला माझा पुरता पडलो पडलो! ओरडलो मी "सकाळ झाली, जागा हो!" आई म्हणाली.  ~~~

ज्ञानोबा तुकोबांनी वर्णन केलेला गणपती आणि त्यांमागील भूमिका!

इमेज
 गणपती हा वेदाने वर्णन केलेला देव. आद्यपुजेचा मानही गणपतीचाच. शंकराला भजणाऱ्या शैव सांप्रदायिकांना गणपती विशेष प्रिय. त्यामुळे आपल्या भगवान विष्णूंची भक्ती करणाऱ्या वैष्णव संतांनी श्री गणेशाला शंकराचे रूप मानुन आपल्या वाणीतून आणि लेखणीतून समाजासमोर ठेवले. हरीहराला प्रिय असलेला हा देव.           ||  १|| अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकार महामंडले। मस्तकाकारे। हे तिन्ही एकवटले। तेच शब्द ब्रम्ह प्रगटले। ते मियांसी गुरुकृपा नमिले आदिबीज।    -संत ज्ञानेश्वर             ||२||  ओंकार प्रधान रूप गणेशाचे  ते हे तिन्ही देवाचे जन्मस्थान अकार तो ब्रम्ह, उकार तो विष्णू मकार महेश जाणियेजा ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप.  तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचिया.           - संत तुकाराम.  यामागे वारकरी( वैष्णव)  संतांची शैव आणि वैष्णव ऐक्याची  भूमिका दिसून येते.     हरीहरा भेद नाही    नका करू वाद ...

माझे गाणे आनंदाचे

इमेज
    बालकवितासंग्रह माझे गाणे आनंदाचे : कादवा प्रतिष्ठानचा स्व.चिंतामण शंकर उगलमुगले पुरस्कार २०२१

ढगांचे संचित

इमेज
कालच कवी जीवन आनंदगावकर यांचा 'ढगांचे संचित' हा कवितासंग्रह हाती पडला. कविता वाचतांना चांगली कविता वाचनाचा आनंद वृद्धिंगत होत गेला. प्रकाशन दिनांक पाहिली तर ती आजचीच आहे. त्यानिमित्ताने या संग्रहावर छोटेखानी लेख लिहीला आहे. अवश्य वाचावा. कवींना खुप खुप शुभेच्छा!  ~~~     • 'ढगांचे संचित' : जीवन आनंदगावकरांची जीवन सन्मुख कविता.                            ° डॉ. कैलास दौंड.               आजची मराठी कविता ही ग्रामीण कविता, महानगरी कविता, स्रीवादी कविता, आदिवासी कविता अशा भिन्न प्रकारात वर्गीकृत झालेली आहे. अशा स्थितीत ज्या कोणाला अशा वर्गीकरणात न सामावणारी निव्वळ, निखळ भावकविता अनुभवायची असेल तर आपल्याला जीवन आनंदगावकर यांचे नाव सहजच आठवेल. हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांचा आत्ता प्रकाशित झालेला 'ढगांचे संचित 'हा कवितासंग्रह होय. या संग्रहातील कवितेतून विविध निसर्गरुपे त्याच्या रंग, गंध, स्पर्श आणि ध्वनी संवेदनांनी अनुभवायास मिळतात. या कवितांना कवीने 'निसर्गवर्णनपर कव...

जाणिवांची फुले

इमेज

जाणिवांची फुले

इमेज

'जाणिवांची फुले

इमेज
जाणिवांची फुले प्रकाशन वृत्त : दैनिक चंपावती पत्र, दैनिक लोकमत, दैनिक दखणी स्वराज्य.   http://www.shirdiexpress.live/2021/09/blog-post_447.html 

जाणिवांची फुले - बालकथासंग्रह

इमेज
° मुलांच्या भौतिक गरजेबरोबरच  भावनिक गरजा भागवणेही      महत्त्वाचे :  दीपक नागरगोजे.      • डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या          बालकथासंग्रहाचे 'शांतिवन' मध्ये प्रकाशन.                   सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांनी लिहिलेल्या 'जाणिवांची फुले' या बालकथासंग्रहाचे प्रकाशन 'शांतिवन' ता. शिरुर(का.) जि. बीड येथे संपन्न झाले. रविवार पाच सप्टेंबर रोजी शांतीवन शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शांतीवनचे संस्थापक सन्मा. दीपक नागरगोजे होते. यावेळी बोलताना त्यांनी, 'बालकांच्या केवळ भौतिक गरजा भागवणेच पुरेसे नसते तर त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक गरजा भागवणेही आवश्यक असते. डॉ. कैलास दौंड यांनी शांतिवन मधील मुलांच्या हस्ते  'जाणिवांची फुले' बालकथासंग्रहाचे प्रकाशन करणे हे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. 'असे मत व्यक्त केले.                        जाणिवांची...

साहित्यप्रेमी बाबुजी आव्हाड साहित्य जागर १२ ऑगस्ट २०२१

इमेज