पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

• वंजारी समाजातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.

इमेज
     वंजारी समाजातील  साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.             वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत नाशिक येथे पहिले साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच वंजारी समाजातील साहित्यिक एकत्र जमत आहेत. संस्थेचे साहित्य संमेलन असल्याने सर्वच साहित्यिक त्यात सहभागी होतील असे नाही. तरीही सहभागी होणाऱ्या सर्वांना माहीती व्हावी या उद्देशाने काही साहित्यिकांच्या लेखन कार्याचा परिचय देणे आवश्यक वाटते. लिहीणारा लेखक खास करून साहित्यरूपातून सर्वांसाठी लेखन करत असतो. जात, पात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेद चांगले साहित्यिक करत नसतात. किशोर सानप, बाबाराव मुसळे, डॉ.कैलास दौंड, राजेंद्र मुंढे, भास्कर बडे, एकनाथ आव्हाड, विवेक उगलमुगले,वा.ना.आंधळे , मनोहर आंधळे,बाळासाहेब गर्कळ इत्यादींच्या लेखनातून ते दिसते.       विशिष्ट  समाजाची साहित्य संमेलने व्हावीत पण साहित्यिकांनी त्या त्या समाजापुरते मर्यादित राहू नये. तर आपले लेखन व्यापक समाज घटकां...

भूमी आणि भूमिकानिष्ठ लेखकांचे आधारस्तंभ : डॉ नागनाथ कोत्तापल्ले.

इमेज
• भूमिका निष्ठ लेखकांचे आधारस्तंभ डाॅ .नागनाथ कोत्तापल्ले.                                डॉ. कैलास दौंड.   मराठी ग्रामीण साहित्य चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिलेदार म्हणून आदरणीय डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना महाराष्ट्र ओळखतो. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चे कुलगुरू ही जशी सरांची ओळख आहे तशीच कवी, कादंबरीकार, लेखक आणि समीक्षक व भाष्यकार ही देखील सरांची ओळख आहे. या सर्वांसोबत असते ते सरांचे  कमालीचे माणूसपण ! इथली भूमी आणि भूमिपुत्र माणसे हा सरांच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय. सन. १९८९-९१ या दोन शैक्षणिक वर्षात डि. एड. साठी मी मुखेड येथे होतो.  त्यावेळी डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले सर मुखेडचे आहेत असे समजले. त्यावेळी ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख होते. दोन वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला सरांचा मुखेडचे खूप सुंदर  चित्रण असलेला लेख वाचला. मुखेड मधील नदी,...

रे आभाळा... :वेदनेची आर्त ललकारी.

इमेज
परीक्षण :     'रे आभाळा… ' : वेदनेची आर्त ललकारी.  • 'रे आभाळा... ': वेदनेची आर्त ललकारी.                                                                                      डॉ. कैलास दौंड               रामकली पावसकर या मराठीतील महत्त्वाच्या कवयत्री आहेत. त्यांचे हंबर(१९८५),  ओले अथांग श्वास(२००८), सांजसावल्या (२०१५) , पावळण (२०१९) हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. आता त्यांचा 'रे आभाळा... ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 'आभाळ' या घटकाशी संवाद साधणारी कविता या कवितासंग्रहात...

डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' बालसाहित्यकृतीला निर्मला मठपती साहित्य पुरस्कार प्रदान

इमेज
सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशन कडुन दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार पाथर्डी येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या जाणिवांची फुले या बालकथासंग्रहास ख्यातनाम समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिवस्मारक सभागृहात दिनांक ३०ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार योगिराज वाघमारे होते. या कार्यक्रमास प्रा.डॉ. शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले यांच्यासह सोलापूर शहरातील लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.          यावेळी बोलतांना प्रा. डॉ. राजशेखर शिंदे म्हणाले की कैलास दौंड यांची 'कापूसकाळ' कादंबरी राष्ट्रीय पुरस्कारांच्या तोडीची होती मात्र आपल्याकडे केवळ साहित्यकृती दर्जेदार असुन भागत नाही ही खंत आहे. दर्जेदार बालसाहित्याच्या बद्दल त्यांनी व्यक्त केलेली खदखद साहित्याप्रतीच्या बांधिलकीचे द्योतक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिराज वाघमारे यांनीही बालसाहित्यात सामाजिक वास्तवाचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रृती श्री वडगबाळकर यांनीही डॉ. कैला...

शिक्षणपर्व आदर्श पाठ

शिक्षणपर्व शिक्षणपर्व

अशी करा कोजागरी पौर्णिमा साजरी, जीवन होईल आनंदी!

इमेज
 आश्विन महिनतील पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश शितल असतो. त्यामुळे उत्साह वाटतो. बरेचजण रात्रीच्या वेळी दूध उकळून पितात. मात्र या रात्री दूध पिण्याच्या आशेने ताटकळत बसण्यापेक्षा कविसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यास मनोरंजनही होईल. व जीवनातील एक रात्र आनंदात जाईल. त्यानंतर दूध प्यावे व झोपी जावे. 

MY LATEST BEST CLICK!

इमेज

जाणिवांची फुले : पुरस्कार

इमेज
   'जाणिवांची फुले' ला चेंबूरच्या 'सांडू प्रतिष्ठानचा' साहित्य पुरस्कार.                      दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान , चेंबूर ,मुंबई  यांच्या कडुन  सकस मराठी  साहित्य निर्मितीला  प्रोत्साहन  मिळावे  या  उद्देशाने , उत्कृष्ट  साहित्यकृतीला प्रतिवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात  येतात.१ एप्रिल २०२० ते  ३१ मार्च २०२२   या कालावधीतील साहित्य पुरस्कार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सांडू प्रतिष्ठानने जाहीर केले आहेत. कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्य आणि संकिर्ण अशा चार साहित्य प्रकारांना हे पुरस्कार देण्यात येतात.  'बालसाहित्य'  या साहित्य प्रकारातील पुरस्कार इसाप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ.कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' या बालकथा संग्रहास जाहीर झाल्याचे दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानने कळवले आहे. पुरस्कार  वितरण  समारंभ दिवाळीनंतर मुंबई येथे होणार आहे. बालसाहित्य प्रकारातील पुरस्कार जाहीर झालेले बालसाहित्यिक असे  प्रथम.श्री. रमे...

विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.' : डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)

इमेज
विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.'      • डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)       अवघड लिहिणं सोपं पण सोपं लिहिणं अवघड असते. तसेच काहीसे बालसाहित्याचे आहे. बालसाहित्य लिहिणे हे तुलनेने अवघड समजले जाते. खरं तर बाल साहित्य लिहिणे, उपलब्ध होणे हे बालकाची अजाण पिढी घडवण्यासाठी आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा हे संस्काराचे, ज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. नकळत मुलांचे भावनिक, बौद्धिक, मानसिक भरणपोषण व्हायचे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही जबाबदारी पुस्तकांवर व बालसाहित्यिकांवर येऊन पडली.  गेली दोन दशके डॉ. कैलास दौंड लिहीत आहेत. आता 'माझे गाणे आनंदाचे' ( बालकविता संग्रह) व 'जाणिवांची फुले' (बाल कथासंग्रह) हा संस्कारक्षम लघु कथा संग्रह अर्थात बालांसाठी त्यांनी आवर्जून प्रकाशित केला आहे. खरं तर सकस ग्रामीण साहित्य लिहिणारे डॉ. कैलास दौंड आवर्जून बालकांसाठी लिहितात हे कौतुकास्पद आहे. ते स्वतः शिक्षक असल्याने प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळी मूल्यांच्या ज्या पूर्वज्ञानावर आधारित आपण शिकवत अस...

काजवा

इमेज
•  काजवा : शिक्षणाधिकाऱ्याचे प्रांजळ नि प्रेरक आत्मकथन.                             डॉ. कैलास दौंड                'काजवा' हे आत्मकथन शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांच्या संस्कारीत आणि संवेदनशील जडणघडणीची प्रेरणादायी कहाणी आहे. आईवडील ऊसतोडणी कामगार,अत्यंत अभावाची परीस्थिती होती. अशा स्थितीत झालेले शिक्षण, गुणवत्तेने मिळवलेली नोकरी, कुटुंबातील प्रेमळ माणसे, जीवनप्रवासात जपलेली मूल्यनिष्ठा याची याविषयी 'काजवा 'त भरपूर वाचायला मिळते. लेखकाच्या आईवडिलांनी गावातील इतरांप्रमाणेच ऊसतोडणी कामगाराचे जीवन जगलेले असले तरी आपल्या मुलांच्या हाती वही पेन देण्याचे शहाणपण अंगीकारल्यामुळे पोपट काळे यांच्यासारखी मोठी सामाजिक जाणीव असणारे अधिकारी घडले. यासंपूर्ण प्रवासाची हकीकतच 'काजवा' मध्ये अनुभवावयस मिळते. लेखकाचे बालपण, शाळा प्रवेश, शिक्षण व त्याकाळातील ओढताण, उच्च शिक्षण, नोकरी, ...

नदी रुसली नदी हसली

इमेज
       • नदी हसली नदी रूसली : सजग करणाऱ्या लोभस कविता.                                                           डॉ. कैलास दौंड. प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा 'नदी हसली नदी रूसली' हा बालकवितासंग्रह सर्वार्थाने बालकांचे लक्ष वेधून घेणारा आहे. यात पर्यावरण ,प्रदुषण, निसर्ग, डोंगर, नदी, समुद्र, टीव्ही, शाळा, वाचन इत्यादी कवितेतून नवी जाणीव  देऊन जातात. नदी प्रदुषण ही तर ज्वलंत समस्या.      ' निसर्गाचे सारे नियम माणसांनी मोडले       शहरातील सांडपाणी नदीमध्ये सोडले. '                     किंवा      ' रेतीचे तिचे धन चोरांनी चोरुन नेले       नदीपात्रात खड्डे करुन तिला जखमी केले.' 'अन्नदाता ' कवितेतील शेतकरी स्वत:ला भूमीचा प...

पं. यादवराज फड यांच्या मैफिलीने रसिकांचे कान तृप्त.

इमेज
पं. यादवराज फड यांच्या मैफिलीने रसिकांचे कान तृप्त.  पाथर्डी - किराणा घराण्याचे प्रतिभावंत गायक पं. यादवराज फड यांनी आपल्या रंजक गायनाने रसिकांच्या काना - मनाची तृप्ती केली. अत्यंत सुरेल आवाज, दमदार आलापी आणि तिन्ही सप्तकात लिलया फिरणारा मुलायम आवाजाने रसिकांना मोहिनी घातली. वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत गायक, श्रीक्षेत्र गहिनीनाथगड संस्थानचे मानकरी असलेल्या ह. भ. प. पुंडलिक महाराज दौंड यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सोनोशी येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी पं. यादवराज फड यांची  मैफिल रंगली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक " पंचपदीने " केली. त्यात ईश स्तवन, जय जय राम कृष्ण हरि, रूप पहाता लोचनी आणि जय जय विठ्ठल रखुमाई या रचनांचा समावेश होता. पुण्यस्मरणाचे औचित्य साधुन तशा अर्थाच्या रचना पं. यादवराज फड यांनी सादर केल्या, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ,याजसाठी केला होता अट्टहास, चाले हे शरीर कोणाचीये सत्ते इत्यादी  रचनांनी रंग भरला. लोक आग्रहास्तव इंद्रायणी काठी  देवाची आळंदी हे अजरामर भक्ती गीत ही सादर केले. कान्होबा तुझी घोंगडी...

गुढीपाडवा (विशेष)

इमेज
     गुढीपाडवा   फाल्गुन सरूनी चैत्र आला   दारी उभारू गुढी   नववर्षाच्या स्वागताची   अशी वाढवू गोडी.   नवी पालवी लेऊन आला   सृष्टीचा हा मित्र   देणे उन्हाचे घेऊन आला   सुंदर महिना चैत्र.   देई सणाचा गोड गोडवा   सर्वा गुढीपाडवा   रूप गुढीचे साज साजरे   सांगे मोद वाढवा.    वस्र नवे लेऊनी नटली   विलोभनीय गुढी   कलश घेऊनी डोईवरती   स्वागत करते खडी.   कडूनिंबाचा मोहरा लागे   गुळासंगती गोडी   आरोग्याची घ्या काळजी   संदेश देते गुढी.   नव वर्षाच्या स्वागताचा   गुढीपाडवा सण   सौर वर्षाच्या प्रथम दिनाला   हे गोड निमंत्रण. ~~~~~ डॉ. कैलास दौंड kailasdaund@gmail.com      

माझे गाणे आनंदाचे : डॉ. रं. म. कदम, मराठी विभाग, अगस्ती महाविद्यालय अकोले

इमेज
 मुलांच्या कल्पना विश्वाचा खजिना  बाल कवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ प्रा. डॉ.रंजना मधुकर कदम डॉ.कैलास दौंड हे मराठी साहित्यातील महत्वाचे आणि मानाचे नाव. त्यांच्या कविता, कथा, कादंबरी इ. वास्तवदर्शी साहित्य वाचकांना आनंद तर देतेच त्याचबरोबर अंतर्मुख करते, विचार करायला भाग पाडते. त्यांनी लिहिलेला बालकवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ हा मुलांच्या बाल मनाला सहज आकर्षित करणारा, रमवणारा, आनंदमय विश्वात घेऊन जाणारा, त्यांचा उत्साह वाढवणारा आणि त्यांना सहजरीत्या खूप काही शिकवणारा आहे. लहान मुलांना नवनवीन, मनोरंजक, आकर्षक कल्पना आवडतात. म्हणूनच लहान मुले या कविता मनापासून वाचतात. कारण या कवितासंग्रहातून लहान मुलांचे उत्साही, खेळकर, काल्पनिक, चित्रमय विश्व साकार झालेले आहे. ते बाल मनाला रमवणाऱ्या विश्वात अगदी सहजतेने घेऊन जातात. उदा. ‘गच्चीवर जेव्हा झोपली मुलं आकाश अलगत खाली आलं अनोखं विश्व मग झालं खुलं चांदण्यांची झाली मोहक फुलं’  यातून दिसून येते की, यात कवीने मुलांच्या परिचयाच्या, त्यांना माहित असणाऱ्या गोष्टी मनोरंजकपणे, मुलांना गंमत-मौज वाटेल, आनंद होईल व तेही विचार करायला ला...

HOLI! होळी आली! बालकविता.

इमेज
    होळी आली.      होळी आली जवळ जराशी    वाढू लागले ऊन रे    डोंगर दऱ्या मधुनी आताशी    घुमू लागली धून रे!     वाळून गेले गवत अवघे    पाणगळही झाली रे    मृगजळाचे घोडे पळती    भुलून सारे भान रे!         पळस, पांगिरा, काटेसावर    लाल फुलांचा जाळ रे    वासाचा हा दरवळ नुसता    सुवास रानोमाळ रे!     कोण वदले या माळाशी    होळी आली म्हणूनी रे?     फाग उधळीत अंगावरती    झाडे अवघी लाल रे!    चला खेळूया आनंदाने   रंग होळीचे छान रे   सृष्टी सगळी ऐका गाते   नव रंगांचे गाण रे!          © डॉ. कैलास दौंड.

'काव्यफुले' सावित्रीबाई फुले यांचा कवितासंग्रह

इमेज
   • सावित्रीबाईंच्या क्रांतिकार्याचे प्रतिबिंब : 'काव्यफुले' कवितासंग्रह.                                           डॉ. कैलास दौंड       थोर समाजसेविका, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, पहिल्या शिक्षिका, महाराष्ट्रातील स्रीयांच्या भाग्यविधात्या क्रांतीज्योती सावित्री ज्योतिबा फुले यांचा  'काव्य फुले' हा इ. स. १८५४ मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला कवितासंग्रह  असून यामध्ये एक्केचाळीस कविता आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या वात्सल्यमय कवीमनाच्या सुंदर रुपाची ओळख 'काव्यफुले' मधुन पटते. पहिलाच कवितासंग्रह असल्यामुळे सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आणि भावविश्वाची ओळख या कविता संग्रहातून  प्रत्ययास येते. समाज शिक्षणाची उत्कट तळमळ असलेल्या सावित्रीबाई यांच्या या कविता प्राधान्याने शिक्षणाकडे वळवणाऱ्या असून या कवितांमधुन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे...

जाणिवांची फुले

इमेज
    (पुस्तक परीक्षण )  • मुलांच्या जाणिवा विकसित करणारी- 'जाणिवांची फुले'                             प्रकाश रामचंद्र क्षीरसागर         पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजोबा आजी, काका- काकी शिवाय एखादी आत्या अशी जाणती मंडळी असायची. ती अनुभवसमृद्ध मंडळी रोज संध्याकाळी दिवेलागणीला परवचे म्हणायची. म्हणवून घ्यायची. त्यावेळी गोष्टीही सांगायची ही मंडळी. कधी कधी झोपताना लहाग्यांना रोज गोष्टी ऐकायला आवडत. गोष्टी ऐकतच ती झोपी जात. परंतु एकविसावे शतक उजाडले तेच मुळे एकत्र कुटुंबाचे विभाजन करीतच. अर्थात विसाव्यात नव्वदीच्या दशकातच त्याची सुरुवात झाली होती. हे सर्व पुराण सांगण्याचे कारण म्हणजे ती उणीव कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या पुस्तकाने बऱ्याच अंशी दूर केली आहे. या पुस्तकात सोळा संस्कारक्षम गोष्टी आहेत.          या गोष्टींतून संस्कार, विज्ञान, वाचनस...

परीक्षण

इमेज
तरल सामाजिक भावनांचा कवितासंग्रह :' बंदिस्त रूढीच्या विळख्यातून'                            डॉ. कैलास दौंड. 'बंदिस्त रूढीच्या विळख्यातून' हा ॲड विशाखा समाधान बोरकर साठहुन अधिक कविता समाविष्ट असलेला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह असल्याने त्यात विविध भावनांचे लक्षवेधी रूपे अनुभवावयास मिळतात. तसेच जीवनप्रवासाची सजग उमज देखील अनुभवता येते. ' हा प्रवास प्रवास क्षणाक्षणांची ही आसर चालता चालता कसा संपतो हा श्वास.' अशा ओळी जीवनाची असोशी आणि काललय दाखवतात. त्या सहजच आवडून जातात. घर माणसाचे असो की त्यांना वात्सल्याची छाया आवश्यक असते. त्यातुन एक आपुलकीचा गंध दरवळत असतो तो सर्वांच्या हृदयाला स्पर्शून जात असतो. अशा वेळी पुढील  ओळी सहजच समोर येतात.         ' तो गंध रानमाळाचा         हृदयी कोरला जाई       ...